नंदुरबार : जेष्ठ साहित्यिका नयनतारा सेहगल यांना उद्घाटनाचे निमंत्रण देऊन ते मागे घेणे ही जाणिवपूर्वक केलेली चूक असून ज्या साहित्यिकांनी त्यामुळे संमेलनावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आह़े ती स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक दिनानाथ मनोहर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केल़ेयवतमाळ येथे होणा:या साहित्य संमेलनातील वादातील चर्चेबाबत दिनानाथ मनोहर बोलत होत़े ते म्हणाले, साहित्य संमेलन घेण्यापूर्वी महामंडळ व आयोजकांकडून बकायदा बैठक होत़े या बैठकीत उद्घाटनासाठी कोणाला बोलवले पाहिजे, यासाठीही चर्चा होत़े हे नाव कुणी एक जण ठरवत नाही़ तर अनेक जण त्यावर मत मांडतात व त्यानंतर निर्णय घेतला जातो़ जर, नयनतारा सेहगल यांच्या नावावर कुणी हरकत घेतली असेल तर त्याबाबतही चर्चा झालीच असेल़ असे असताना उद्घाटनासाठी बोलवणे व नंतर नाही सांगणे ही गंभीर बाब आह़े ती केवळ चूक नाही तर जाणिवपूर्वक केलेली चूक आह़े त्यामुळे ज्या साहित्यिकांनी अशा प्रकारामुळे संमेलनावर बहिष्कार टाकला आहे, ते खरोखरच स्वागतार्ह आह़े आता संमेलनाध्यक्षांनी संमेलनात काय बोलावे व काय बोलू नये त्यावर दबाव आणू नये, हीच अपेक्षा़
सेहगल यांचा अपमान जाणिवपूर्वक - मनोहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 9:13 PM