लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भोई समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात समाजातील 105 उपवर तरूण-तरूणींनी आपला परिचय करून दिला. यात बहुसंख्य पदवीधर उपवरांचा समावेश होता. दरम्यान काही अपंग उपवरांनीदेखील परिचय करून दिला होता.अखिल भारतीय भोई सेवा संघ नंदुरबार जिल्हा व तळोदा भोई समाज पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील माळी समाज मंगल कार्यालयात रविवारी भोई समाजाच्या राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. या वेळी अध्यक्षस्थानी समाजाचे प्रदेश अध्यक्ष डॉ.हिरामण मोरे होते. कार्यक्रमास आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, पालिकेचे प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडीले, नगरसेवक संजय साठे, माजी जिल्हाध्यक्ष सुपडू खेडकर, नगरसेविका शोभाबाई भोई, योगेश चौधरी, निखीलकुमार तुरखिया, धडगावच्या नगराध्यक्षा सुरेखा मोरे, तळोदा तालुकाध्यक्ष शिवदास भोई, समितीचे अध्यक्ष धनलाल भोई, भूता भोई, हिरकन भोई, अशोक शिवदे, रमेश भोई, राजेश भोई, संजय मोरे, भिकमचंद शिवदे आदी उपस्थित होते.याप्रसंगी आमदार उदेसिंग पाडवी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, जिल्ह्यातील भोई समाजाने तळोदा सारख्या आदिवासी भागात राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा घेतल्याने खरोखर कौतुक आहे. तसा भोई समाज इकडे तिकडे भटकंती करून आपला उदर निर्वाह करीत असतो. त्यामुळे खर्चिक रूढी-परंपरांना फाटा देवून समाजानेही या सारखे उपक्रम राबवून सामूदायिक विवाहाचेही आयोजन करण्याचे आवाहन केले. या वेळी समाजाध्यक्ष डॉ.मोरे, नगराध्यक्ष परदेशी, गौरव वाणी यांनीही मार्गदर्शन केले. या राज्यस्तरीय मेळाव्यात संपूर्ण राज्यभरातून आलेल्या जवळपास 105 तरूण-तरूणींनी आपला परिचय करून दिला होता. यात बहुसंख्य पदवीधरांचाही समावेश होता. आपल्या परिचयात त्यांनी आपले मूळ गाव, जन्म तारीख, शिक्षण, नोकरी व व्यवसाय याची माहिती करून दिली. काही अपंग तरुणांनीदेखील या वेळी आपला परिचय करून दिला होता.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष लऋक्ष्मण वाडीले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.चंद्रकांत भोई, प्रकाश वानखेडे तर आभार रवींद्र वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी भोई समाजातील विविध संघटना व तरूणांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान याप्रसंगी समाजातील काही लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले होते. शिवाय आदर्श पुरस्कारार्थ्ीचादेखील सन्मान करण्यात आला होता.शहादा येथील रवींद्र वाडीले हे समाजातील जन्माला आलेल्या नवजात मुलीच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत तीन हजार 100 रूपये ठेव म्हणून ठेवतात. शिवाय अशा दाम्पत्याचा सन्मानही करीत असतात. आता पावेतो बहुसंख्य मुली आणि दाम्पत्यांचा सन्मान त्यांनी केला आहे. हा उपक्रम ते गेल्या वर्षभरापासून राबवित आहे. त्यांच्या या कार्याचा गौरवदेखील उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते कार्यक्रमात करण्यात आला होता. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातून कौतुकही करण्यात आले होते.
भोई समाजाच्या 105 उपवर तरूण-तरूणींनी दिला परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 1:06 PM