n लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपण बुधवारी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.सी. बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. आयान साखर कारखान्याच्या गाळप हंगामास डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी बुधवारी बॉयलर अग्नि प्रदिपन करण्यात आले. कारखान्याची गाळप क्षमता दुपट्टीने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील सर्व ऊस योग्य पद्धतीने आणि वेळेत गाळप करण्यात येईल. याबाबत नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. बॉयलर अग्नि प्रदीपन कार्यक्रमाला प्रकल्प उभारणी कंपनी मेरूचे मॅनेजर मोरे, शेतकी अधिकारी अरविंद पाटील, चीफ केमिस्ट एन.डी. पाटील, मुख्य अभियंता अनिल चोपडे, डिस्टिलरी मॅनेजर भामरे, डेप्युटी को- जन मॅनेजर एस. रणवरे, ऊस विकास अधिकारी के.जी. मराठे, स्थापत्य अभियंता के.जी. कदम, मुख्य लेखाधिकारी पद्माकर टापरे, कामगार अधिकारी श्री.जी. भगत, सुरक्षा अधिकारी बागुल, सर्व अभियंता, विविध विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आयन साखर कारखान्याचे अग्निबॉयलर प्रदीपन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:52 PM