शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
4
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
5
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
6
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
7
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
8
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
9
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
10
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
11
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
13
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
14
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
15
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
16
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
17
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
18
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
19
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
20
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप

जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष यंदाच्या वर्षी तरी भरून निघावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 12:33 PM

मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष मोठा आहे. तो दूर करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा ...

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष मोठा आहे. तो दूर करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. काही प्रत्यक्षात सुरू झाल्या तर काही कागदावरच आहेत. काही योजनांची कामे अपुर्ण असून ती निधी उपलब्ध करून देत पुर्ण झाली पाहिजे. नर्मदा व उकईचे पाणी उचलण्यासाठीची योजना दिवास्वप्न ठरणार आहेत. प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे पाणी दरवर्षी पावसाळ्यात सोडून द्यावे लागते. जर मंजूर योजना व सुरू असलेल्या योजना प्रत्यक्षात आकारास आल्या तर जिल्हा सुजलाम-सुफलाम होईल यात शंका नाही. यंदाच्या वर्षात त्याला गती मिळावी अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे. रापापूर प्रकल्पबाधितांच्या विरोधामुळे बंद असलेले काम प्रकल्पबाधितांशी संवाद साधून मे २०१९ पासून सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे ५५५ हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. येत्या दीड वर्षात हा प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे. अक्कलकुवा तालुक्यातील १८ वषार्पासून बंद पडलेले रामपूर प्रकल्पाचे काम भूसंपादनाचा प्रश्न सोडवून जानेवारी २०१९ पासून सुरू करण्यात आले आहे. दीड वर्षात प्रकल्प पुर्ण झाल्यावर ३५४ दलघमी पाणीसाठा निर्माण होणार आहे. देहली मध्यम प्रकल्पाचे काम ३५ वषार्पासून रखडलेले होते. गेल्या तीन वर्षात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवून बांधकाम पुर्णत्वास आले आहे. चालु वर्षी घळभरणी पुर्ण झाल्यावर १९ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या ११ किमी कालव्याचे काम ९० टक्के झाले आहे. नवापूर तालुक्यातील कोरडी मध्यम प्रकल्पात ११.४९ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला असून गेल्या तीन वर्षात डावा व उजवा कालव्याचे काम वितरीकांसह पुर्ण करण्यात आले आहे. त्याद्वारे २ हजार हे. क्षेत्र सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. नागन प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामालाही गती देण्यात आली असून यावर्षीच्या रब्बी हंगामात ३५० हे. क्षेत्र सिंचन क्षमता साध्य करण्यात आली आहे. कालव्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे कामदेखील पुर्ण झाले आहे. भूरीवेल धरणाचे घळभरणी करून ३.६४ दलघमी पाणीसाठा निर्माण करण्यात आला आहे. बंदिस्त पाईपलाईनद्वारे ७६१ हेक्टर क्षेत्र सिंचनाचे नियोजन करण्यात येत असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे. 

निधी अभावी ठप्प झालेला तापी-बुराई प्रकल्प प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्याच्या ८ किलोमीटर पाईप लाईनचे ९० टक्के व दुस-या टप्प्यातील ६ किमी पाईपलाईनचे ७० टक्के काम पुर्ण करण्यात आले आहे. जॅकवेलचे जमीन तलांकापर्यंत २० मीटरचे काम पुर्ण करण्यात आले आहे. सद्या हा प्रकल्प निधीअभावी ठप्प झाला आहे. निधी उपलब्धतेची अशीच गती राहिली तर पुढील ३० वर्षात देखील ती पुर्ण होणार नाही. 

जिल्ह्यातील पहिलीच कालव्याऐवजी बंदीस्त पाईपलाईन...जिल्ह्यात प्रथमच शिवण मध्यम प्रकल्पांतर्गत पारंपरिक कालव्याऐवजी बंदिस्त पाईपलाईन प्रणालीचे काम पुर्ण करण्यात येऊन ८२९ हे. क्षेत्र सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. बिलाडी ल.पा. योजनेसाठी भूसंपादनाची प्रक्रीया वेगाने सुरू आहे.  तळोदा तालुक्यातील धनपूर ल.पा. योजनेअंतर्गत धरणाची २०१७ मध्ये घळभरणी करून ३.१८ दलघमी पाणीसाठा निर्माण करण्यात आला. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली असून शेतक-यांना उपलब्ध सिंचनाचा लाभ होत आहे. या धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे ४९० हेक्टर क्षेत्र सिंचन करण्याचे नियोजन आहे.  

सिंचन क्षमात वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन... नंदुरबार जिल्ह्यातील १४ व धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील ८ अशा गेल्या ३० वषार्पासून बंद पडलेल्या २२ सहकारी उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्ती कामास शासनाने विशेष बाब म्हणून ४१ कोटींच्या रकमेस प्रशासकीय मान्यता     दिली. त्यापैकी ६ उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीची कामे   करण्यात येऊन  चाचणी घेण्यात आली आहे.  इतरही १०२ योजना कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही होणे अपेक्षीत आहे.  या योजनांमुळे १४ हजार हे. क्षेत्र सिंचन क्षमता निर्माण करण्याचे नियोजन आहे. येत्या वर्षात या कामाला गती येईल असे अपेक्षीत आहे.