या वेळी स्वामी विवेकानंद सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताह कालावधीत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सप्ताहाचा समारोप संस्थेचे अध्यक्ष गुलाब महाजन, संस्थेचे सचिव देवेंद्र माळी, सुनंदा पाटील यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. याप्रसंगी विजय माळी यांनी उपस्थितांना हरितक्रांतीची शपथ दिली तर यत्ता नववीचा विद्यार्थी पवन माळी याने स्वामी विवेकानंदांच्या वेशात ‘मी विवेकानंद बोलतोय’ या एकपात्री नाटिकेतून विवेकानंदांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांसमोर सादर केले. यानंतर महात्मा फुले ब्रिगेडतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना महात्मा फुले ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश पाटील, ब्रिगेडच्या महिला अध्यक्षा सुनंदा पाटील, मच्छींद्र माळी, अविनाश महाजन, भाग्येश पाटील व कार्यकर्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष गुलाब महाजन, सचिव देवेंद्र माळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक एन.जी. भावसार यांनी विवेकानंदांची भूमिका साकारणाऱ्या पवन प्रकाश माळी याचे स्वागत करून प्रास्ताविक सादर केले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयकुमार माळी तर आभार निंबा माळी यांनी मानले.
स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये जयंती उत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:23 AM