लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या ५६ गणांचे निकाल हाती आले असून सत्तास्थापनेत मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ भाजपाने जिल्हा परिषदेत धमाकेदार एंट्री घेतल्याने रंगत वाढली आहे़ भाजपाने २० गटात विजय प्राप्त केल्याने सत्तास्थापनेत त्यांचा वाटा मोठा राहण्याची चिन्हे आहेत़नवापुर तालुक्यातील १० गटांपैकी काँग्रेसने ५, राष्ट्रवादी ३ तर भाजपाने दोन गटात विजय मिळवला़ नंदुरबार तालुक्यातील १० गटांपैकी काँग्रेसने १, शिवसेनेने २ तर भाजपाने सहा जागी विजय मिळवला़शहादा तालुक्यातील चौदा गटांपैकी ७ ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत़ तर चार गटांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत़ तालुक्यातील तीन गटांचा निकाल शिल्लक होते़अक्कलकुवा तालुक्यातील १० गटांचे निकाल जाहिर झाले़ यात भाजपाचे २, शिवसेनेचे ३ तर काँग्रेसने पाच जागी विजय प्राप्त केला़सातपुड्याच्या दुर्गम भाग आणि आदिवासी विकास मंत्री के़सी़पाडवी यांचे प्राबल्य असलेल्या धडगाव तालुक्यात सात पैकी ३ गटात शिवसेना तर ४ गटात काँग्रेसचे उमदेवार विजयी झाले आहेत़ पंचायत समित्यांचे पक्षीय बलाबल अद्याप पुढे आलेले नसून जिल्हा परिषद निवडणूकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ़ कुमुदिनी गावीत यांचाही विजय झाला आहे़ त्यांनी कोठली गटातून विजय प्राप्त केला आहे़ त्या खासदार डॉ़ हीना गावीत यांच्या आई तर आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांच्या पत्नी आहेत़ गावीत कुटूंबातीलच माजी आमदार शरद गावीत यांच्या कन्या अर्चना गावीत ह्या नांदर्खे ता़ नंदुरबार गटातून विजयी झाल्या आहेत़ गावीत परिवारातील सदस्यांच्या विजयामुळे भाजपाला जिल्हा परिषद निवडणूकीत अभूतपूर्व असे यश मिळाले आहे़
जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी होणार रस्सीखेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 2:46 PM