कल्पेश नुक्ते । लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अक्कलकुवा- साधारण 100 वर्षांची परंपरा लाभालेल्या कालिका देवीच्या यात्रोत्सवाला यंदाही मोठय़ा थाटात सुरूवात झाली़ माघ शुद्ध पौर्णिमा निमित्त बुधवारी भाविकांच्या प्रचंड गर्दीत यात्रोत्सवाला प्रारंभ झाला़ सकाळी नवस फेडणा:यांसह देवीचे दर्शन व ओटी भरण्यासाठी महिलांची रिघ लागली होती़ दुर्गम व अतीदुर्गम भागासह गुजरात राज्यातून भाविकांची हजेरी लागत असल्याने गेल्या चार दिवसांपूर्वीपासून व्यापा:यांनी व्यवसाय थाटण्यास सुरूवात केली होती़ यात्रोत्सवात सर्वात महत्त्वाचा मानल्या जाणा:या सुप्रसिद्ध बैलबाजारात यंदाही बैलांची आवक होण्यास प्रारंभ झाला असून सायंकाळर्पयत 700 बैलांची आवक झाल्याचे सांगण्यात आल़े प्रत्यक्ष व्यवहारांना गुरुवारी सकाळपासून सुरूवात होणार आह़े मनोरंजनाची साधने, खेळणी, खाद्यपदार्थ, मसाले, गृहपयोगी साधने, कपडे, चांदीचे दागिने यासोबतच याठिकाणी विविध शेतीची औजारे विक्रेतेही उपस्थित होत़ेजीर्णोद्धार कमिटी अध्यक्ष माजी आमदार डॉ नरेंद्र पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली, पंचायत समितीचे माजी सभापती आमश्या पाडवी, नवरतन जैन, माजी उपसरपंच विश्वासराव मराठे, मनोज डागा, तुकाराम लोहार, भाऊ राणा, राजू कोटला, विजय सोनार, भिकमचंद चौहान, पृथ्वीसिंग पाडवी यांच्या सहभागाने हे कार्य पूर्ण झाले होत़े 2007 साली विजय नारायण सोनार यांच्या अध्यक्षतेखाली नवीन ट्रस्टची स्थापना करण्यात आली आणि पुढे 2009 साली माजी आमदार डॉ नरेंद्र पाडवी यांच्या नेतृत्वात नवीन 23 विश्वस्तांची कमिटी बनविण्यात आली.यात्रोत्सवानिमित्त यंदाही जामली, खटवाणी, काकरपाडा व गंगापूर आदी गावांकडून पौर्णिमेला तगतरावांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली आहे. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तगतरावांचे रथ तयार करून सवाद्य मिघालेल्या मिरवणूकांमध्ये ग्रामस्थ मोठय़ा संख्येने सहभागी झाले होत़े गावाच्या विविध मार्गावरून तगतरावांची शोभायात्रा काढण्यात आली होती़ यानंतर कालिका माता मंदिराच्या 5 प्रदक्षिणा पूर्ण करून रथ यात्रेत फिरवून पुन्हा गावाकडे परत गेल़े देवीच्या यात्रोत्सवानिमित्त प्रथम पूजेचा मान हा काठी संस्थानिकांना दिला जातो़ यंदाही ही परंपरा पाळली गेली आह़े यात्रोत्सवात सातपुडय़ाच्या दुर्गम अतीदुर्गम भागासह विविध भागातील आदिवासी बांधव आणि नागरिकांची हजेरी लागत असल्याने याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आह़े
अक्कलकुव्यात कालिकामातेच्या यात्रोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:57 PM