लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : तळोदा तालुक्यात कळमसरे येथे शनिवारी पुन्हा एकदा शेतातील साहित्य चोरीला जाण्याची घटना घडली़ येथील बन्सी हिरजी पाटील यांच्या कळमसरे शिवारातील सिंचनाच्या नळ्या चोरीला गेल्या आहेत़ त्यामुळे परिसरातील शेतक:यांकडून संताप व्यक्त होत आह़े याआधी शुक्रवारी कळमसरे शिवारातीलच गणेश चौधरी यांच्या शेतातील दोन हजार 60 रुपये प्रमाणे ठिबकची पाच बंडल चोरीला गेली होती़ त्यानंतर पुन्हा याच शिवारातील बन्सी पाटील यांच्या पाच एकरावरील ठिबक सिंचनाच्या नळ्या चोरीला गेल्या आहेत़ 25 हजार रुपये किंमतीची 10 बंडल चोरीला गेली आहेत़ रात्री केळीला शेतात पाणी देण्यासाठी बन्सी पाटील यांनी आपल्या शेतात ठिबकच्या नळ्या ठेवल्या होत्या़ परंतु सकाळी त्या चोरीला गेल्या असल्याने त्यांच्या लक्षात आल़े याबाबत अज्ञात चोरटय़ाविरुध्द बोरद येथील पोलीस दुरक्षेत्रात तक्रार नोंदविण्यात आली आह़े दरम्यान, या ठिकाणी वारंवार चोरीच्या घटना होत असल्यान शेतकरी हवालदिल झाला आह़े आधिच परिसरात पाण्याची टंचाई जाणवत आह़े त्यातच शेतक:यांकडून ठिबकच्या सहाय्याने पाणी देऊन पीक जगवण्यासाठी धडपड करण्यात येत असत़े महागडय़ा ठिबकच्या नळ्या घेण्यात येऊन शेती फुलविण्यात येत़े त्यात, अशा प्रकारे चोरटे शेती उपयोगाची साहित्य चोरी करत असतील तर शेतक:यांनी जगावे कसे? असा प्रश्न आता विचारण्यात येत आह़े येथील चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन निरुपयोगी ठरत असल्याचा आरोप आता शेतक:यांकडून करण्यात येत आह़े रात्रीच्या वेळी चोरटे संधी साधत असून यामुळे शेतक:यांना मोठा आर्थिक फटका बसत आह़े पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाय योजना कराव्या अशी मागणी होत आह़े
कळमसरे शिवारातून सलग दुस:या दिवशी ठिबक नळ्या चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:46 PM