वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या दोन वर्ग खोल्यांपैकी एका वर्ग खोलीच्या भिंतीला मोठ मोठे तडे गेल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भिंतीला लागूनच असलेल्या वर्ग खोलीमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्याथ्र्याच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या वर्गखोलीच्या दुरवस्थेबाबत करणपाडा व्यवस्थापन समितीच्या मुख्यकार्यकारी अधिका:यांना निवेदन देण्यात आले आहे.अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. याठिकाणी दोन वर्ग खोल्या असून, त्यामध्ये एका वर्ग खोलीच्या भिंतीला मोठमोठे तडे पडले असून, छताच्या वरील काही भागदेखील सरकला आहे. त्यामुळे त्यातून पावसाचे पाणी पडून ते भिंतीत मुरत असल्याने पायाचा भागही खचल्याचे चित्र दिसून येत आहे.या वर्ग खोलीला लागूनच असलेल्या दुस:या वर्ग खोलीत इयत्ता पहिली ते चौथीर्पयतचे विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत आहेत. या वर्ग खोलीला लागून असलेल्या वर्ग खोलीच्या भिंतीला तडे गेल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाल्याचे करणपाडा येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास ईश्वर तडवी, उपाध्यक्ष अरविंद दशरथ पाडवी, सदस्य दिनेश पाडवी, गणेश पाडवी, गौवरीबाई वळवी, लताबाई तडवी, सुनिता वळवी, ललिता वळवी, लता तडवी, गमिरसिग नाईक, अनिल पाडवी, राजकुमार वळवी, उत्तम पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी अक्कलकुवा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे.
करणपाडा जि.प.शाळा धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:20 PM