लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जलयुक्त शिवार अभियान, जेएनपीटी व आर्ट ऑफ लिव्हींग शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने कवळीथ वळण बंधा:यातून निघणारे कालवे पुजरुज्जीवीत करण्यात आल्याने सहा मोठे तलाव, 18 केटीवेअर बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.कवळीथ बंधा:यातून निघणारे कालव्याचे खोलीकरण, गाळ काढणे आदी कामे जलयुक्त शिवार अभियान, जेएनपीटी व आर्ट ऑफ लिव्हींग शहादा यांनी लोकसहभागातून राबविली. या कामामुळे हे कालवे दीड महिन्यापासून पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. कवळीथ, सोनवल त.ह., आसूस, टेंभली, लोणखेडा, पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, कौठळ त.श., सोनवद, मोहिदे त.श., वरुळ-कानडी, शिरुड, वर्ढे-टेंभे, ससदे या गावांच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढल्याने बंद पडलेल्या कुपनलिका, विहिरी पुनरुज्जीवीत झाल्या आहेत. या कालव्यामुळे सहा मोठे तलाव, 18 केटीवेअर बंधारे पूर्ण क्षमतेने प्रथमच भरले असून आर्ट ऑफ लिव्हींगच्या कामामुळे ग्रामस्थ व शेतक:यांच्या चेह:यावर समाधान पहावयास मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, शहादा आर्ट ऑफ लिव्हींगचे किशोर पाटील, पाटबंधारे विभागाचे पी.जी. पाटील यांनी परिसरातील शेतक:यांसोबत वरुळ-कानडी, वर्ढे-टेंभे, शिरुड येथील कालव्यांना भेट देऊन पाहणी केली. शिरुड, वर्ढे-टेंभे येथील शेतक:यांनी स्वखर्चाने एक ते दीड किलोमीटर कालव्यातील गाळ काढून त्यांच्या शेतार्पयत पाणी नेले व 50 ते 60 हेक्टर कापूस, मका पिकांना जीवदान दिले.या वेळी शिरुड येथील माणक पाटील यांनी सांगितले की, या भागात कालव्याच्या कामामुळे 65 वर्षात प्रथमच कालव्याचे पाणी आल्याने सर्वसाधारण शेतक:यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. कुपनलिका पुनरुज्जीवीत झाल्या असून दोन पाझर तलाव भरले गेले. विहिरींनाही 10 फुटावर पाणी आल्याने आम्ही शेतकरी आनंदी व समाधानी असून जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, आर्ट ऑफ लिव्हींगचे किशोर पाटील, हरिश पाटील, पाटबंधारे विभागाचे पी.जी. पाटील यांचे शेतक:यांच्या वतीने त्यांनी आभार मानले.
कवळीथ कालव्याने केले बंधारे व तलाव पुनजिर्वीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:27 AM