शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मागण्या मान्य होईर्पयत ‘ठिय्या’ सुरुच ठेवणार

By admin | Published: February 21, 2017 12:04 AM

वनदावे व ‘पेसा’चा प्रश्न : लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली एकवटले मोर्चेकरी

नंदुरबार : वनहक्क कायद्यान्वये वनाधिकारांचे 45 हजार 615 वैयक्तिक दाव्यापैकी 21 हजार 369 दावे पात्र ठरविण्यात आले. उर्वरित दाव्यांसाठी जनपक्षीय अंमलबजावणी व्हावी व पेसा कायद्यांतर्गत विविध प्रश्न सोडविले जावे यासह इतर मागण्यांसाठी लोक संघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. सायंकाळी उशिरार्पयत प्रशासनाशी चर्चा सुरू होती. दरम्यान, मागण्या मान्य होईर्पयत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी सांगितले. सकाळी 11 वाजता सातपुडय़ाच्या द:याखो:यातील हजारो आदिवासी महिला, पुरुष, युवक नंदुरबारात दाखल झाले. सुभाष चौकात दुपारी तीन वाजेर्पयत सभा घेण्यात आली. यावेळी प्रतिभा शिंदे यांच्यासह विविध वक्त्यांनी आपली मते मांडली. त्यानंतर प्रतिभा शिंदे यांच्यासह रामदास तडवी, काथा वसावे, ङिालाबाई वसावे, अशोक पाडवी, रमेश नाईक, गणेश पराडके, बोखा वसावे, यशवंत पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर प्रशासनाशी चर्चा सुरू करण्यात आली. रात्री उशिरार्पयत चर्चा सुरूच होती. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात एकूण 39 हजार 615 दावे दाखल असून मुदतीबाहेर म्हणून अद्याप न स्विकारलेल्या दाव्यांची संख्या सुमारे सहा हजार आहे. अर्थात जिल्ह्यात वनाधिकारांचे 45 हजार 615 एवढे वैयक्तिक दावेदार असून सामूहिक दाव्यांसाठी 450 गावसमित्या पात्र आहेत. जिल्हास्तरीय समितीन 21 हजार 369 वैयक्तिक दावे व 262 सामूहिक दावेच पात्र केले आहेत. याशिवाय वनहक्क कायद्याची जनपक्षीय अंमलबजावणी करावी. अक्कलकुवा तालुक्यातील 989, धडगाव तालुक्यातील 464 दाव्यांसाठी सुधारित अधिनियमाप्रमाणे संधी उपलब्ध करून द्यावी. सुधारित नियमाप्रमाणे क्षेत्रीय तपासणी करावी. वनजमिनींचा सातबारा मिळविण्याबाबत अक्कलकुवा येथील ठाण्याविहीर व तळोदा येथील कालीबेली, रानमहू, चौगाव, रापापूर, जांभाई येथील लोकांच्या ताब्यात असलेली जमिनीचा प्रश्न सोडवावा. जिल्ह्यात वनअधिनियमानुसार किती समित्या, जैव विविधतान्वये समित्यांची स्थापना यांची माहिती द्यावी, धडगाव तालुक्यातील 73 वनगावे वगळता असे पाडे अथवा वस्त्या आहेत का? याची माहिती द्यावी. सूक्ष्मनियोजन आराखडय़ाचे एकत्रीकरण उपलब्ध करून द्यावे. पेसा क्षेत्रातून वगळण्यात आलेल्या गावांचा पुन्हा समावेश करावा. आंबाबारी व देहली प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावावा. धडगाव तालुक्यातील तिनिसमाळ गावाचे विकसनशील व न्यायपूर्ण पुनर्वसन करावे. रोजगार हमी   योजनेचे काम सुरू करण्यात यावे, मजुरांची बाकी देण्यात यावी, अनियमितता असलेल्या कामांची चौकशी करावी, रेशननिंग व्यवस्था पारदर्शी करावी, सर्व महसूल गावांना स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी यासह इतर मागण्यांचा समावेश   आहे.प्रशासनाशी चर्चा करणा:यांमध्ये प्रतिभा शिंदे व लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिका:यांसह माजी आमदार पद्माकर वळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक आदी उपस्थित होते. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी, जि.प.सीईओ घन:शाम मंगळे, पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रात्री उशिरार्पयत विविध मागण्यांवर आंदोलकांशी प्रशासनाची चर्चा सुरूच होती.    सातपुडय़ाच्या द:याखो:यातील पाडे, वस्तीमधून हजारो आदिवासी बांधव सकाळी 11 वाजता नंदुरबारात दाखल झाले. महाराणा प्रताप पुतळ्यापासून सुभाष चौकात मोर्चाद्वारे आल्यावर तेथे दोन तास सभा झाली. रणरणत्या उन्हातदेखील मोर्चेक:यांचा उत्साह टिकून होता. दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यास सुरुवात झाली. पावणेपाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर तेथे गेटबाहेर मोर्चेक:यांना अडविण्यात आले. प्रचंड घोषणाबाजीनंतर शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाशी चर्चेला सुरुवात केली. रात्री उशिरार्पयत चर्चा सुरू राहण्याची शक्यता असून मागण्या मान्य होईर्पयत ठिय्या आंदोलन करण्याचाही निर्धार मोर्चेक:यांच्यावतीने करण्यात आला.