नंदुरबार : जिल्ह्यात लागवड करण्यात आलेल्या सुमारे तीन हजार हेक्टर केळीची तोड सुरू आह़े या केळीला प्रथमच व्यापा:यांकडून 1450 रूपये प्रती क्विंटल दर देऊन खरेदी करण्यात येत आह़े जिल्ह्यात यंदा प्रथमच सुमारे 2 दोन हजार 913़15 हेक्टर केळीची लागवड झाली आह़े या लागवड क्षेत्रातील केळी उत्पादनाला सुरूवात झाली आह़े यंदा दरांमध्ये उतार येण्याची शक्यता काही दिवसांपूर्वी शेतक:यांनी वर्तवली होती़ मात्र या उलट स्थिती निर्माण होत गेल्या काही दिवसांपासून व्यापारी केळीला प्रती क्विटल 1350 ते 1450 रूपये दर देत आहेत़ यामुळे शेतक:यांमध्ये समाधान निर्माण झाले आह़े नंदुरबार 236, शहादा 1 हजार 237, अक्कलकुवा 351 तर तालुक्यात तळोदा 1 हजार 89 हेक्टर केळी लागवड झाली होती़ जिल्ह्यातून दर दिवशी 100 टनांच्यावर मालाची खरेदी व विक्री करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े
केळीला यंदा दमदार भाव
By admin | Published: February 17, 2017 1:25 AM