लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : तालुक्यातील काकर्दे येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारा गाडय़ांची लांगड भगत बन्सीलाल महाजन यांनी ओढली. या वेळी नवस फेडण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.अक्षयतृतीयेनंतर तिस:या दिवशी काकर्दे येथे श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरते. गेल्या 15 वर्षापासून बन्सीलाल महाजन (भगत) यांनी बारा गाडय़ांची लांगड ओढली. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम झाला. या वेळी श्री खंडेराव महाराज मंदिरात नैवद्य देणे व पूजेचा मान शंकर भापकर यांच्या कुटुंबाला मिळाला तर मंदिरावर प्रथम ध्वज चढविण्याचा मान रामदास मिस्तरी यांना मिळाला. लांगड ओढण्याआधी भगत व वाघ्या-मुरळी यांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. यावेळी भंडारा (हळद) व खोब:याची उधळण करण्यात आली. दरम्यान, नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी काकर्देसह परिसरातील गावांमधील भाविकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.
काकर्दे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:30 PM