शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

खान्देश लोककला महोत्सव ठरला लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:03 PM

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शहादा तालुक्यातील असलोद येथे खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या वतीने खान्देश लोककला महोत्सव 2018 उत्साहात झाला. ग्रामीण भागातील कलावंतांनी सादर केलेल्या भजने, भारुडे, एकतारी भजन यामुळे प्रेक्षक भारावून गेले. ग्रामीण संस्कृतीचे व विविध कला दर्शनाने उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. निस्वार्थ भावनेने कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणा:या ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शहादा तालुक्यातील असलोद येथे खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या वतीने खान्देश लोककला महोत्सव 2018 उत्साहात झाला. ग्रामीण भागातील कलावंतांनी सादर केलेल्या भजने, भारुडे, एकतारी भजन यामुळे प्रेक्षक भारावून गेले. ग्रामीण संस्कृतीचे व विविध कला दर्शनाने उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. निस्वार्थ भावनेने कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणा:या कलाकारांना सरकारने जाचक अटी शिथील करून भरघोस मानधन दिल्यास ग्रामीण कला संस्कृती जीवंत राहण्यास मदत होईल, असा सूर या महोत्सवातून व्यक्त करण्यात आला.जिल्ह्यात प्रथमच हा लोककला महोत्सव असलोद येथील संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळाच्या प्रयत्नाने भरविण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन मंडळाचे प्रदेश अध्यक्ष अनिल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप गांगुर्डे, मंडळाचे प्रदेश महासचिव शोभाबाई खैरनार, प्रदेश सदसञया सरुबाई महाजन, जिल्हाध्यक्ष पांडुरंग माळी, तालुकाध्यक्ष छोटू शिंदे, पं.स. सदस्य लगन पावरा, भैय्या वानखेडे, सरपंच बेबीबाई सोनवणे उपस्थित होते.कलावंतांचा गुणगौरवमहोत्सवाच्या प्रारंभी नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शाहीर, भारुड कलावंत, कीर्तनकार, भजन कलावंत अशा 25 कलावंतांचा गुणगौरव मानचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन मंडळाच्या पदाधिका:यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सहभागी झालेल्या प्रत्येक भजनी मंडळ कलावंतांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देण्यात आले.कला सादरीकरणाने प्रेक्षक भारावलेया लोककला महोत्सवात संपूर्ण खान्देशातून सुमारे तीन हजार कलावंत सहभागी झाले होते. त्यात धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबार, पारोळा, निजामपूर या भागातील कलावंतांनी हजेरी लावून आपली कला सादर केली. त्यात एका कलापथकाने सादर केलेले समाज जागृतीपर भारुडाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. तसे आदिवासी भागातून आलेल्या भजनी मंडळांनीही एकतारी भजने सादर करून सर्वाना आकर्षित केले. अनेक भजनी मंडळातील कलावंतांनी उत्कृष्टपणे भजने सादर केली. सर्व साहित्यानिशी पेटी, तबला, टाळ, मृदुंग यासह कलावंतांनी हजेरी लावल्याने कार्यक्रमात मोठी भर पडली.मान्यवरांची उपस्थितीमहोत्सवात भजनांचा कार्यक्रम सुरू असताना सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक, नगरसेवक प्रकाश ठाकरे आदींनी हजेरी लावली. याप्रसंगी राजेंद्रकुमार गावीत यांनी ग्रामीण भागात एवढे चांगले कलावंत असताना कला अकादमीच्या माध्यमातून त्यांची दखल घेतली गेली नाही याबाबत खंत व्यक्त करून महोत्सवात सहभागी कलावंतांचे कौतुक केले. खेडेगावात राहून भजने, कीर्तन, भारुडाच्या माध्यमातून समाज जागृतीचे खरे कार्य करीत लोककला जीवंत ठेवण्याचे काम पिढय़ान्पिढय़ा सुरू ठेवूनही समाजात कशा कलाकारांना किंमत दिली जात नाही. यापुढे अशा कलावंतांची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी लोककला महोत्सवाच्या आयोजनाबाबत प्रशंसोद्गार काढून या महोत्सवामुळे कलाकारांच्या कलेचे ख:या अर्थाने दर्शन घडते. खेडेगावात भजनासह भारुड, गवळण सादर करणा:या कलाकारांचे समाजात मोठे योगदान असते. त्यांच्या निस्वार्थी सेवेची सरकारने गंभीरपणे दखल घेऊन अशा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने मानधनात वाढ केली पाहिजे, असे सांगितले. दीपक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.या महोत्सवाची सांगता ज्ञानेश्वर भजनी मंडळाने सादर केलेल्या भजनाने झाली. महोत्सव यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे अध्यक्ष शेणू पाटील, प्रवीण गिरासे, देवेसिंग गिरासे, संतोष चव्हाण, रमेश पवार, लिंबा पवार, गणेश निकम, रतिलाल लोहार, धर्मा मराठे, दिलीप राजभोज, तालुकाध्यक्ष छोटू शिंदे व ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दीपक गिरासे यांनी तर आभार नानाभाऊ शिंदे यांनी मानले.