शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

खांडबा:यात जमावाच्या मारहाणीत दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:53 AM

तलवारीने मारहाण : 16 जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शैक्षणिक संस्थेच्या जागेसाठी ना हरकत दाखला मिळाला असतांनाही त्यावर हरकत घेवून 50 हजारांची मागणी मान्य न केल्याने एकास जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना खांडबारा, ता.नवापूर येथे 26 रोजी घडली. याप्रकरणी जमावाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खांडबारा येथील आदिल रफिक अरेबियानी यांनी निंबोणी शिवारात शैक्षणिक संस्था काढण्यासाठी ना हरकत दाखला मिळविला होता. त्यावर फारूख युसूफ मेमन यांनी हरकत घेवून 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यावरून त्यांच्यात वाद होऊन जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत लोखंडी रॉड व तलवारीचा उपयोग करण्यात आला. याशिवाय 15 हजार रुपये रोख व 30 हजार रुपयांची सोन्याची चेन देखील जमावाने जबरीने चोरून नेली. त्यात आदिल रफिक अरेबियानी व रियास हाजीभाई अरेबियानी हे जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबत आदिल रफिक अरेबियानी यांच्या फिर्यादीवरून फारूक युसूफ मेमन, उस्मान युसूफ मेमन, यासीन युसूफ मेमन, जैतून युसूफ मेमन, यास्मीन उस्मान मेमन, सिरीन यासीम मेमन, रफिक गफार मेमन, अल्तम रफिक मेमन, फातीमा इंद्रीस मेमन, फिरोज सत्तार मेमन, बल्कीश फिरोज मेमन, हाजी लतीफ मेमन, रफीक हाजी इसानी, इलीयास हाजी इसानी, अल्ताफ गफार इसानी, हमीद अल्ताफ इसानी सर्व रा.खांडबारा यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गावात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला असून लवकरच संशयीतांना अटक करण्यात येणार आहे.