लोकमत न्यूज नेटवर्ककोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळपासून पाच किलोमीटर अंतरावर खापरखेडा गावाजवळ डोंगराळ भागात 1970 मध्ये रंगूमती नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाला 50 वर्षे होत असून, या धरणाची अद्यापर्पयत दुरूस्ती करण्यात आली नसल्याने पाण्याचा अपेक्षित साठा होत नाही. गेल्या 10 वर्षापासून शेतकरी धरणाच्या दुरुस्तीची मागणी करीत आहेत. मात्र त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. खापरखेडा धरणाच्या पाण्यामुळे सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल एवढी क्षमता होती. या धरणामुळे कोंढावळ, जयनगर, बोराळे, वडाळी या गावातील शेतक:यांच्या शेतीला फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या 50 वर्षापासून धरणातील गाळदेखील काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणातील पाणी क्षमतेत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत 100 हेक्टर जमिनीलाही त्याचा उपयोग होत नाही. महागडी बियाणे पेरुन शेतकरी आहे त्या परिस्थितीत पिके जगविण्याचा प्रय} करतात. परंतु या पिकांना शेवटचे पाणी मिळत नसल्याने ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याचे शेतक:यांनी सांगितले. या सर्व प्रकारास पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षापासून धरणातील गाळ व दुरूस्तीच्या कामाची माहिती घेतली असता लाखो रुपयांची बिले पास झाल्याचे समजते. मात्र धरणाचे कोणत्याही प्रकारे दुरूस्तीचे काम केल्याचे दिसून येत नाही. धरणात पाणी कमी व गाळ अधिक साचला आहे. धरणाचे मेनगेट 10 वर्षापासून नादुरुस्त असल्याने त्याद्वारे पाणी पास होत नाही. त्याठिकाणी मोठा बोगदा पडला असून या बोगद्याद्वारे पावसाचे पाणी वाहून जाते. धरणाचा काही भाग खचला असल्याने त्याद्वारेही पाणी वाहून जाते. धरणाच्या बांधावर काटेरी झुडपे प्रचंड प्रमाणात वाढले असून दगडी पिचींगही उखडली आहे. डिसेंबर 2018 मध्ये पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचा:यांनी खापरखेडा व कोंढावळ धरणाची पाहणी केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तरी या धरणातील गाळ काढण्यासह दुरूस्तीचे काम होण्याची अपेक्षा आहे. मात्र संबंधित पावसाळ्यात तात्पुरती डागडुजी करून बिले काढत असल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आहे.दरम्यान, या परिसरात दोन नद्या व लहान नाले असून, या नदी-नाल्यानंवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले होते. परंतु तेही पहिल्याच पावसात वाहून गेल्याने याठिकाणी शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दुरुस्तीअभावी खापरखेडा धरण निरुपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 9:06 PM