नंदुरबार : जिल्ह्यात 2016-17 या वर्षात पावसाळ्यात 61 दिवस पावसाची नोंद होती़ परिणामी रब्बी हंगामातील धान्य पिकांच्या उत्पादनात थेट 1़09 टक्के घट आली होती़ खरीप हंगामातही हीच स्थिती होती़ गेल्या तीन वर्षात सातत्याने खरीप आणि रब्बी पिकांच्या उत्पादन घटीचा सामना करावा लागत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आह़े खर्च करुन उत्पादन निघत नसल्याने अनेकांनी यंदा पेरण्याच केलेल्या नाहीत जिल्ह्यात यंदा 67 टक्के पावसाची नोंद होऊन चार तालुक्यात दुष्काळी घोषित झाली आहेत़ याचा परिणाम खरीपानंतर रब्बी पिकांच्या पेरण्यांवर झाला आह़े यामुळे चालू हंगामात 5 हजार 240 हेक्टर क्षेत्रात रब्बी ज्वारी आणि 8 हजार 881 हेक्टर क्षेत्रात गहू पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ सर्वसाधारण क्षेत्राच्या 40 टक्के झालेल्या धान्य पिकांच्या पेरण्या पाण्याअभावी थांबवल्याचे सांगण्यात येत आह़े येत्या काळात गहू आणि ज्वारीच्या हेक्टरी उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आह़े परंतू उत्पादन घटीचे हे दुष्टचक्र गेल्या तीन वर्षापासून कायम असून सर्वाधिक फटका गेल्या वर्षात बसल्याचे शासनाकडून जाहिर झालेल्या आकडेवारीवरुन समोर आले आह़े जिल्ह्यात 2015 मध्ये 9 हजार 323 हेक्टरमध्ये ज्वारी पेरा झाला होता त्याची उत्पादकता ही हेक्टरी 995 किलो एवढी होती़ वाढीव असलेली ही उत्पादकता 2016 मध्ये मात्र कमालीची घटून प्रती हेक्टर 886 र्पयत आली होती़ यातून 182़66 मेट्रीक टन ज्वारीचे उत्पादन होऊन 39 टक्के उत्पादनात घट आली आह़े शेतक:यांना सर्वाधिक आधार देणा:या गहूचे गेल्या 2017 च्या रब्बी हंगामातील एकूण उत्पादन हे केवळ 309 मेट्रीक टन एवढे होत़े 18 हजार 352 हेक्टरवरील या गहूची उत्पादकता 1 हजार 684 किलो होती़ किमान 2 हजार 100 किलोग्रॅम असलेली उत्पादकता अचानक खाली आल्याने 19़ टक्के उत्पादन घट झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े धान्याचे उत्पादन कमी झाल्याने आदिवासी शेतक:यांनी ज्वारी आणि बाजरी खरेदी करुन आणावी लागली होती़ यातून अनेकजण कजर्बाजारी झाले होत़े गहू आणि ज्वारीसोबत इतर धान्य पिकांच्या पे:यात कमालीची घट आली आह़े यात प्रामुख्याने बाजरीचा समावेश आह़े 2017 मध्ये 6 हजार हेक्टर क्षेत्रावरील बाजरीचे हेक्टरी 867 किलोग्रॅम उत्पादन आले होत़े तर केवळ 46 मेट्रिक टन बाजारीचे जिल्ह्यातून उत्पादन झाले होत़े बाजारीचे सरासरी 28 टक्के उत्पादन घटल्याने यंदा जिल्ह्यात बाजरीची पेरणीलाही सुरुवात झालेली नसल्याची माहिती आह़े नवापूर आणि नंदुरबारसह अक्कलकुवा तालुक्यात खरीप हंगामात पेरणी होणा:या भाताच्या शेतीला यंदा मोठा फटका बसला आह़े 2017 मध्ये भाताचे सरासरी क्षेत्र 20 हजार हेक्टर एवढे होत़े यातून प्रति हेक्टर 1 हजार 03 किलोग्रॅम उत्पादन शेतक:यांना मिळू शकले होत़े तर जिल्हाभरात 254 मेट्रीक टन भाताचे उत्पादन घेतले गेले होत़े यंदा मात्र हे उत्पादन निम्मेही नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आह़े शेतक:यांना केवळ मका पिकाने दिलासा दिला होता़ 2 हजार 389 किलो हेक्टरी उत्पादकता असलेल्या मक्याचे जिल्ह्यात तब्बल 514 मेट्रीक टन उत्पादन आले होत़े
खरीप आणि रब्बी पिकांना लागले उत्पादन घटीचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:44 PM