लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात खरीप पीक पेरण्यांची कामे सध्या वेगात सुरु असून यातून आजअखेरीस ४४ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे़ आतापर्यंत सर्वाधिक शहादा तर सर्वात कमी पेरण्या ह्या तळोदा तालुक्यात झाल्या आहेत़जिल्ह्यात यंदा २ लाख ९५ हजार २१९ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्या करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे़ यापैकी १ लाख ३२ हजार १७७ हेक्टर क्षेत्रात आजअखेरीस पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ तालुकानिहाय पेरणीत सर्वाधिक ३५ हजार १६० हेक्टर पिकपेरा हा शहादा तालुक्यात झाला आहे़ नंदुरबार तालुक्यात २९ हजार १५४, नवापूर २६ हजार ९११, तळोदा ३ हजार ६४३, धडगाव १८ हजार ९०५ तर अक्कलकुवा तालुक्यात १८ हजार ४०३ हेक्टर क्षेत्रात खरीप पिके पेरली गेली आहेत़ खरीप पिकांसोबतच शेतकऱ्यांनी ऊस लागवडही सुरु केली असून आतापर्यंत ३ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे़शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती यंदाही कापसाला दिसून येत आहे़ कापूस लागवडीचा वेग वाढला असून ६० टक्के क्षेत्रात कापूस टोचणी पूर्ण झाली आहे़ गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारली असली तरी पाऊस येण्याची चिन्हे असल्याने शेतकºयांकडून दरदिवशी पेरणी व शेतीकामांना वेग देण्यात येत आहे़ यंदा खत टंचाईची सर्वाधिक मोठी समस्या असतानाही शेतकरी मागील वर्षाचे शिल्लक खत आणि चालू वर्षातील मिळालेले खत याची मात्रा देऊन पिकांचे संगोपन करण्यात व्यस्त असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध भागात दिसून येत आहे़ येत्या पाच दिवसात जिल्ह्यात अतीवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे़ यामुळे शेतकºयांमध्ये काहीअंशी भिती असली तरी पावसामुळे जमिनीतील ओल कायम होणार असल्याने पिकांच्या संगोपनातील अडथळे दूर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ सपाटीच्या तालुक्यांसह सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावांमध्येही पिकांची पेरणी करण्यात येत असून शेतकरी पारंपरिक कडधान्य पिकांना प्राधान्य देत आहेत़ यांतर्गत धडगाव तालुक्यात यंदा साडेसहा हेक्टर क्षेत्रात उडीदाचा पेरा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़यंदा जिल्ह्यात १ लाख ५ हजार ६६१ हेक्टर खरीप पिकाचे निर्धारण आहे़ यापैकी ६३ हजार ४३० हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण करण्यात आली आहे़ नंदुरबार २४ हजार ६०, नवापूर ४ हजार, शहादा २७ हजार ९२६, तळोदा २ हजार ६९७, धडगाव ७९० तर अक्कलकुवा तालुक्यात ३ हजार ९५३ हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे़ जिल्ह्यात ५ हजार ८१२ हेक्टरवर भात, १६ हजार २९९ हेक्टरवर खरीप ज्वारी, १ हजार हेक्टरवर बाजरी, २३१ हेक्टर मका, ५ हजार ८५ हेक्टर तूर, १ हजार ४३८ हेक्टर मूग, ६ हजार ३४४ हेक्टर उडीद, १० हजार १०५ हेक्टरवर सोयाबीन आदी पिकांची पेरणी पूर्ण करण्यात आली आहे़ खरीप ज्वारीच्या उत्पादनात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे़ शनिवारपर्यंत जिल्ह्यात १६ हजार २९९ हेक्टरवर खरीप ज्वारीचा पेरा झाला आहे़ यात नंदुरबार १ हजार ६९५, नवापूर ३ हजार २६६, शहादा १ हजार १८७, तळोदा २०१, धडगाव ७ हजार ८४० तर अक्कलकुवा तालुक्यात २ हजार ११० हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली आहे़ दुर्गम भागातील दोन तालुक्यात ज्वारी पेरणीचा वेग वाढता आहे़ धडगाव तालुक्यात १३५ टक्के ज्वारी पेरणी आहे़यंदाच्या हंगामातही कापूस पेरणीला पसंती दिली जात आहे़ यांतर्गत यंदा १ लाख ५६ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड होणार आहे़ यापैकी ६३ हजार ४३० हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड पूर्ण झाली आहे़ सर्वाधिक २७ हजार ९२६ हेक्टर कापूस शहादा तालुक्यात लागवड झाला आहे़ त्यानंतर २४ हजार ६० हेक्टर कापूस नंदुरबार तालुक्यात लागवड झाला आहे़ इतर चार तालुक्यात कापूस पेरा सुरु आहे़
जिल्ह्याच्या ४४ टक्के क्षेत्रात खरीप पेरण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:16 PM