सारंगखेडा : सारंगखेडा ता़ शहादा येथे आयोजीत चेतक फेस्टीव्हलमध्ये ‘सारंगश्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आली़ या स्पर्धेत राज्यातील 22 जिल्ह्यातील 150 खेळाडू सहभागी झाले होत़े स्पर्धा महाराष्ट्र बॉडीबिल्डींग असोशिएशनच्या सहकार्याने घेण्यात आली़ स्पर्धेत नगर येथील किरण पाटील या शरीरसौष्ठवपटूने ‘सारंगश्री’ हा बहुमान मिळवला़ तर उत्कृष्ट पोजर म्हणून नगर येथीलच निलेश वाडेकर यांची निवड करण्यात आली़ तर प्रगतशील शरीरसौष्ठवपटू म्हणून ठाणे येथील योगेश निकम विजयी ठरला़शरीरसौष्ठव स्पर्धा 8 गटात खेळविण्यात आली़ राज्यभरातून आलेल्या खेळाडूंमधून या ठिकाणी विजयी झालेले खेळाडू उजैन येथे होणा:या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणार आहेत़ 55 किलो वजन गटात मुबई येथील अजिंक्य पवार हा प्रथम, मुंबई उपनगर संघाचा मुकेश कामटे व्दितीय तर तृतीय क्रमांक ठाणे येथील रमेश जाधव यांनी मिळवला़ 60 किलो वजन गटात पहिला क्रमांक नांदेड येथील शिवम झगडे, व्दितीय क्रमांक तन्मय शिरोडकर पुणे, तृतीय क्रमांक नाशिक येथील प्रवीण बागडे यांनी पटकावला़65 किलो वजन गटात जळगाव येथील अन्वर खान प्रथम, व्दितीय महोम्मद रऊफ, तृतीय क्रमांक बीड येथील शेख इरफान यांनी पटकवला़ 70 किलो वजन गटात प्रथम क्रमांक ठाणे येथील दिनेश कांबळे, व्दितीय क्रमांक राजेश कथे, तृतीय क्रमांक रोनी अमीन यांनी पटकावला़ 75 किलो वजन गटात प्रथम लोकेश निकम, व्दितीय मनीष शिरसाठ, तृतीय सुमित रावत यांचा क्रमांक आला़ 80 किलो वजन गटात प्रथम रवींद्र वंजारी, व्दितीय भास्कर कांबळे, तृतीय जयराम भारवानी यांनी विजय मिळवला़ 85 किलो वजन गटात प्रथम नरेश नागदेर, व्दितीय शेख सोहिल, तृतीय लोकेश अभंगे यांनी विजय मिळवला़ 90 किलो वजन गटात प्रथम किरण पाटील, व्दितीय महेंद्र चव्हाण, तृतीय कर्मक आजम खान यांनी विजय मिळवला आह़े
किरण पाटील यांना मिळाला ‘सारंगश्री’चा बहुमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:16 AM