संतोष सूर्यवंशी । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली ‘पेपरलेस’ ग्रामपंचायत झाली आह़े ग्रामपंचायतीकडून सर्व दाखले ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत असून ग्रामपंचायतीचा कारभारदेखील फायलीमुक्त होणार आह़े येथील कर्मचा:यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले असून तेही आता ‘टेकAोसेव्ही’ होत असल्याचे दिसून येत आह़ेशासकीय कामकाज म्हटले म्हणजे कार्यालयांमध्ये फायलींचे गठ्ठे, सर्वत्र दिसून येणारे शासकीय कागपत्रांचे ढिग व त्यावर साचलेली धुळ आदी विदारक चित्र असत़े त्यामुळे शासकीय कार्यालयांचे जास्तीत जास्त कामकाज हे ‘पेपरलेस’ व ‘टेकAोसेव्ही’ पध्दतीने व्हावे यासाठी शासनाकडून आग्रह धरण्यात येत आह़े ‘पेपरलेस’ व्यवहारामुळे स्मार्टवर्कसोबत पर्यावरणाचाही समतोल राखण्यास मदत होत असत़े हेच गांर्भीय ओळखत नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द ग्रामपंचायतीने ‘पेपरलेस’ काम करण्याचे शिवधनुष पेलण्याचा निर्णय घेतला़ सुरुवातीला याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात आल़े परंतु सर्व विचाराअंती गेल्या 1 एप्रिलपासून ग्रामपंचायतीत सर्व व्यवहार ‘पेपरलेस’ पध्दतीने सुरळीत होत आहेत़ त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी तसेच कर्मचा:यांचाही आत्मविश्वास आता दुनावला आह़े ग्रामपंचायतीत होत असलेल्या या बदलाला गावातील ग्रामस्थांनीही सकारात्मक पध्दतीने स्विकारलेले दिसून येत आह़े ‘पेपरलेस’ कारभारासाठी ग्रामस्थांकडूनही मोठी मदत मिळत असल्याचे सांगण्यात येत आह़े ग्रामपंचायतीअंतर्गत सुरु असलेले विविध कामे ई-ग्राम या सॉफ्टवेअरव्दारे करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यात, जन्म-मृत्यू दाखले, घरपट्टीची पावती, सात नंबरचा सामान्य व वैयक्तिक उतारा, रहिवासी दाखला, विविध करांची वसुली पावती आदींचा समावेश आह़ेया सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास शासनाच्या हेल्पलाईन नंबरव्दारे तक्रार नोंदणीची सुविधादेखील उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आल़े यासोबतच ग्रामपंचायतीचे सर्व रेकॉर्डही आता ऑनलाईन ‘सेव्ह’ करण्यात येणार आह़े
कोठली ग्रामपंचायत झाली ‘पेपरलेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:01 PM