लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील मोहिदे येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर आवश्यक बाबींसह सुसज्ज करण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर येथे उपचार करण्यात येणार आहे.नंदुरबार येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांची वाढती संख्या आणि उपचारासाठी होणारी तारांबळ यासाठी शहादा येथे देखील कोविड उपचार कक्ष सुरू करावे अशी मागणी होत होती. याबाबत ‘लोकमत’ ने देखील वेळोवेळी पाठपुरावा केला होता. एकुण परिस्थिती लक्षात घेता आता शहादा येथे नवीन कोविड उपचार कक्ष सुरू करण्यात आला आहे.यासाठी तीन शिफ्ट डॉक्टर्स, नर्स आणि स्वच्छता कर्मचारी कार्यरत असणार आहेत.प्रत्येक खोलीत दोन व्यक्ती राहतील. प्रत्येक मजल्यावर पाच टॉयलेट ब्लॉक्स आणि पाच बाथरूम आहेत.आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच प्रत्येक रूममध्ये कचराकुंडी, मच्छररोधक, डोअर मॅट आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्यात येणार आहेत. यामुळे लक्षणे विरहित कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना मोहीदे, ता. शहादा येथेच उपचार होणार आहेत.आजपासून कोविड केअर सेन्टर कार्यरत होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली. या केंद्रासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके यांनी मार्गदर्शन केले.
शहाद्यातही कोविड उपचार कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:25 PM