लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : गेल्या दोन दिवसांपासून तळोदा तालुक्यातील बोरद व मोड शिवारात बिबटय़ाचे वास्तवळ असल्याने मजूर शेतात राबण्यास तयार होत नसल्याची स्थिती आह़े त्यामुळे शेतात कामासाठी मजूरच मिळत नसल्याने शेतक:यांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आह़ेबोरद येथे गुरुवारी सकाळी उसाच्या शेतात कृष्णदास काशीनाथ पाटील यांना बिबटय़ाचे दर्शन झाल़े ते आपल्या सबमर्शिबल पंप टय़ुबवेलमध्ये सोडत असतानाच बिबटय़ा एका वराहाच्या मागे धावत असल्याचे त्यांना दिसून आल़े यासोबत कृष्णदास पाटील यांच्यासोबत चार ते पाच मजूरदेखील होत़े बिबटय़ाचे दर्शन होताच त्यांनी हातातील काम सोडून गावाकडे पळ काढला़ प्रत्यक्षदर्शीनी बिबटय़ाला पाहिल्याने तो पूर्णपणे वयस्क असल्याचे दिसून आल़े बिबटय़ा दिसल्याचे ग्रामस्थांना समजताच काही ग्रामस्थांनी बिबटय़ा दिसला त्या ठिकाणी आगेकूच केली़ परंतु तोर्पयत तेथून बिबटय़ा पसार झाला होता़ बोरद-मोड परिसर हा बिबटय़ाच्या अधिवासात मोडत असल्याने या ठिकाणी अनेक वेळा बिबटय़ा दिसून येत असतो़ परंतु यामुळे येथील शेतकरी व मजुरांमध्ये मोठय़ा प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आह़ेकधी बिबटय़ा स्वता तर त्याचे बछडे दिसून येत असल्याने अजून किती बिबटे या परिसरात आहे याची माहिती नाही़ याबाबत वनविभागाकडेही माहिती नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आह़े ़़आणि बिबटय़ाचे झाले दर्शनमोड परिसरात सध्या उसतोड अंतीम टप्प्यात आह़े कारखानदार व खांडसरींच्या कामगारांच्या माध्यमातून या ठिकाणी उसतोड करण्यात येत आह़े बुधवारी सकाळी मजूर उसतोडीसाठी शेतात गेले असता उसाच्या आडोशाला बिबटय़ा शांत झोपलेला असल्याचे मजुरांना दिसून आल़े त्या वेळी मजुरांचा चांगलाच थरकाप उडाला़ काडीचाही आवाज न करता त्या वेळी मजुरांनी आपली पावले माघारी वळवली होती़ अशा सततच्या घटनांमुळे मजुरांमध्ये बिबटय़ाची चांगलीच दहशत निर्माण झालेली आह़े दरम्यान, ग्रामस्थांनी सांगितल्यानुसार येथील बिबटय़ा कुत्रा, वराह, कोंबडय़ा, बक:या आदी नैसर्गिक साखळीतील प्राण्यांचीच शिकार करीत आहेत़ आतार्पयत त्यांनी मनुष्यावर हल्ला केल्याचा प्रकार घडलेला नाही़ परंतु शेवटी जंगली प्राणी असल्याने तो मनुष्यावरही कधी काही हल्ला करु शकतो असे मत ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आले आह़े त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने सापळा किवा जाळीच्या माध्यमातून येथील बिबटय़ांना जेरबंद करुन गावाच्या बाहेर सोडावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े
बिबटय़ाच्या वास्तव्यामुळे मजूर भयग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 4:33 PM