शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

पावसामुळे जमीन मोजणी लांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:04 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या बाधितांना ताबा पावती देऊनही संबंधित मालकाकडून जमिनी मिळत नव्हत्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या बाधितांना ताबा पावती देऊनही संबंधित मालकाकडून जमिनी मिळत नव्हत्या. प्रशासनाकडे याप्रकरणी सातत्याने मागणी करूनही प्रशासनानेही साफ दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नर्मदा बचाव आंदोलनाने सोमवारी जमीन कब्जा आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. परिणामी तब्बल तीन वर्षानंतर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळाला आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे जमिनीची मोजणी व सिमांकन होऊ शकले नाही.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील विस्थापितांचे तळोदा तालुक्यातील त:हावद पुनर्वसन येथे 2008 मध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. यातील बहुसंख्य विस्थापितांना शासनाने जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. तथापि या वसाहतीमधील रामजी पुयरा वसावे, तिज्या रेरा पाडवी, खाज्या सुरज्या वळवी, मोगराबाई सुरज्या वसावे, दित्या सुरजा पाडवी, खेमा वेस्ता पाडवी, नरपा पुयरा पाडवी अशा आठ ते दहा जणांना प्रशासनाने सन 2017 मध्ये त:हावद शिवारातील सव्रे क्रमाक 176 मध्ये जमिनी दिल्या आहेत.या जमिनीच्या ताबा पावत्यासह सातबारेदेखील उपलब्ध करून दिले आहेत. मात्र संबंधीत जमीन मालकांची शासनाकडे पाच टक्के रक्कम बाकी होती. त्यामुळे हे मालक विस्थापितांना जमिनी कसू देत नव्हते. ते स्वत: जमिनी कसत होते. वास्तविक त्यांच्याकडे ताबा पावत्या असतांना व नावावर असतांना केवळ मालकांच्या काही रक्कमेसाठी बाधितांना वेठीस धरले जात होते.जमिनीचा कब्जा मिळण्यासाठी बाधितांनी शासनाकडे गेल्या तीन वर्षापासून तगाजा लावला होता. त्यांना कार्यवाही सुरू आहे एवढेच मोघम उत्तरे देऊन परत पाठविले जात होते.  बाधितांच्या वतीने नर्मदा बचाव आंदोलनाने सोमवारी त:हावद शिवारात जमीन कब्जा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. बाधित आणि जमीन मालकांचा संघर्ष होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार प्रभारी तहसीलदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण हे महसूल व पोलिसांच्या ताफ्यासह त:हावद पुनर्वसन येथे पोहोचले. तेथे जमिनीचे मूळ मालकदेखील होते. तेथे जवळपास दोन ते अडीच तास प्रशासन, प्रकल्प बाधित व मूळमालक यांच्यामध्ये चर्चा झाली. मालकाने पाच टक्के रक्कमेची मागणी केली तर बाधितांनीही दोन वर्षापासूनच्या उत्पन्नाची मागणी केली. या वेळी चांगलीच बाचाबाचीदेखील झाली होती. शेवटी उत्पन्नातील अर्धी रक्कम संबंधित शेतक:याने बाधितांना दिल्या शिवाय पाच टक्के रक्कम देऊ नये असे ठरल्यानंतर विस्थापितांना जमिनीचा ताबा देण्यात आला. याबाबतच्या पंचनामाही प्रशासनाने केला आहे. त्यामुळे तब्बल तीन वर्षानंतर जमिनीसाठी हैराण झालेल्या बाधितांना जमिनी मिळाल्यात. या वेळी नर्मदा बचाव आंदोलनाचे चेतन साळवे, लतिका राजपूत, शिरस्तेदार ए.बी. पाटील, मंडळ अधिकारी  माया मराठे,  भूमिअभिलेख अधिकारी एस.बी. पाडवी, तलाठी, एम.के. साळवे, शामजी वसावे, पुण्या वसावे, ओरसिंग पटले, लालसिंग वसावे, पंडित पावरा, थुवा:या वळवी, रुमा वळवी आदी उपस्थित होते.

प्रकल्पात विस्थापित झालेल्या 12 ही वसाहतीतील साधारण साडेचारशे बाधितांनी आपल्या शेतात शासनाने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणून प्रशासनाकडे प्रकरणे दाखल केली आहेत. मात्र यावर अजूनही ठोस कार्यवाही केली जात नसल्यामुळे प्रकरणे धुळखात पडले आहेत. त्यामुळे विस्थापितांनादेखील सिंचनापासून वंचित राहावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली.