लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील करण चौफुली ते वळणरस्त्यावर उड्डाणपुल यादरम्यान ट्रक चालकाची लुट करत पसार होणा:या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केवळ दोन तासात अटक केली़ मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला होता़ मंगळवारी पहाटे 3 ते 3़30 दरम्यान करण चौफुली ते उड्डाणपुल यादरम्यान हायवेवर ट्रकला मोटारसायकलीने मागून आलेल्या दोघांनी थांबवत चालकाचा मोबाईल, पैशाचे पाकिट हिसकावून घेत पळ काढला होता़ ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़ त्यांनी तातडीने पोलीस कॉन्स्टेबल अभय राजपूत व आनंदा मराठे यांना रवाना करत चोरटय़ांचा शोध घेण्यास सांगितले होत़े त्यानुसार शोध सुरु असताना दोघा कर्मचा:यांनी भूषण मधुकर पाटील रा़ मेघ नगर यास ताब्यात घेतले तर दुसरा संशयित पळून गेला होता़ दरम्यान पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास एलसीबीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी हे वळणरस्त्यालगत गस्त घालत असताना जाणता राजा चौकात टपरीच्या आडोशाला दुचाकी लावून एकजण बसला असल्याचे दिसून आले त्याची चौकशी केली असता गोरख हेमाजी गवळी रा़ जाणता राजा चौक असल्याचे निष्पन्न झाल़े दोघा संशयितांची विचारपूस केली असता ट्रकचालकास लुटल्याची दोघांनी कबुली दिली़ दोघांविरोधात ट्रकचालक दिनेशसिंग अजयसिंग राजपूत रा़ तखतपूर्णा बिहार याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दोघांकडून 55 हजार रुपये किमतीची दुचाकी, 3 हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि 6 हजार 500 रुपये रोख असा ऐवज जप्त करण्यात आला आह़े पोलीस अधिक्षक संजय पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मागदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, भगवान कोळी, पोलीस नाईक भटू धनगर, महेंद्र सोनवणे, अभय राजपूत व आनंदा मराठे यांनी ही कारवाई केली़
ट्रकचालकास लुटणारे दोन तासात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:15 AM