लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 4 : पिंगाणे ते कुकडेल दरम्यान गोमाई नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी होते. या वेळी खासदार डॉ.हीना गावीत, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, जि.प. सदस्य अभिजित पाटील, कार्यकारी अभियंता जेलसिंग पावरा, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे, तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण व फित कापून पुलाचे विधीवत उद्घाटन केले. पालकमंत्री रावल म्हणाले की, हा पूल शहादे तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा असून शेतक:यांसाठी लाभदायक ठरेल. एका बाजूला ग्रामीण भाग असून मंदिर आहे तर दुस:या बाजूला शहराला लागून मस्जिद असल्याने शहादा व पिंगाण्याला जोडणारा पूल म्हणजे एकोपा दर्शवणारा पूल आहे. शहादा शहराला जास्तीत जास्त माङया निधीतून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रय} असून नदीकाठावर चौपाटीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, शहादा शहर हे जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर आहे. सोनगीर ते शहादा हा महामार्ग होणार असल्याने सातपुडय़ातील आदिवासींच्या विकासाचे केंद्र म्हणून धडगावदेखील जोडले जाईल. हा महामार्ग लवकर व्हावा म्हणून माझा पाठपुरावा सुरु असल्याचे त्या म्हणाल्या. आमदार उदेसिंग पाडवी म्हणाले की, गोमाई नदीवरील हा चौथा पूल असून स्व.पी.के. अण्णांच्या प्रेरणेने पूर्ण केला. या पुलामुळे पाच किलोमीटरचा चा फेरा वाचणार आहे. ग्रामीण भागाला जोडणारा दुवा ठरणार आहे. सूत्रसंचालन दिनेश खंडेलवाल यांनी केले. कार्यक्रमास अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ, उपअभियंता कमलाकर साळुंखे, ठेकेदार रवींद्र पाटील यांच्यासह पिंगाणे ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोमाई नदीवरील पुलाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:43 PM