लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील रेल्वे स्थानकावर लाईफ लाईन सेवेचे उद्घाटन आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारपासून रुग्णांची तपासणी व उपचार सुरू करण्यात आले आहेत.लाईफ लाईन सेवेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सिक डॉ.रघुनाथ भोये, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी जिल्हाधिकारी अनिल पवार, लाईफ लाईनच्या डॉ.रोहिनी चौगुले, डॉ.मानसिंग पवार, रेल्वे स्टेशन प्रबंधक बी.एल. मंडळ, राजेश कुमार, मोहन खानवाणी, सविता जयस्वाल, सपना अग्रवाल, संजय शाह, रवींद्र गिरासे, आनंद माळी उपस्थित होते.या वेळी डॉ.मानसिंग पवार यांनी लाईफ लाईनमध्ये देण्यात येणा:या मोफत उपचारांबाबत माहिती दिली. यात 20 ते 25 डॉक्टरांची टिम असून, काही ठिकाणी जिल्हा रुग्णालयातील कर्मचा:यांचाही सहभाग घेण्यात येणार आहे.उद्घाटनपर भाषणात डॉ.गावीत यांनी सांगितले की, अधिकाधिक गरजू रुग्णांची याचा लाभ घ्यावा. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येणार असून, याठिकाणी अपंग, अस्थिव्यंग व विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येणार आहे. ही सेवा 21 दिवसांसाठी असून, या काळात मोठय़ा प्रमाणात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कॅन्सर तपासणी, रक्तदाब, मधुमेह अशा विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहे.नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्याने पुढील काळात शिक्षणासाठी मोठय़ा प्रमाणावर सुविधा उपलब्ध होणार आहे. ही योजना केंद्र सरकारची असून, युवकांना त्याचा फायदा होणार आहे. सूत्रसंचालन योगेंद्र दोरकर तर आभार डॉ.पवार यांनी मानले.
रेल्वे स्थानकावरील लाईफ लाईन सेवेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:42 PM