लोकमत ऑनलाईनतळोदा, दि़ 14 : तळोदा येथील खर्डी नदीच्या खोलीकरण व स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला़ सकाळी नऊ वाजेपासून खोलीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली़ या वेळी आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, पालिका सभापती भास्कर मराठे, सामाजिक कार्यकर्ते निसारअली मक्रानी, मुख्याधिकारी जनार्दन पवार आदी उपस्थित होत़े या कामासाठी 8 जेसीबी व 12 टॅक्टरचा समावेश करण्यात आला आह़े त्याच प्रमाणे नदीच्या स्वच्छतेसाठी पालिका कर्मचा:यांकडून आपले एका दिवसाचे वेतन देण्यात आले आह़े आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी स्वच्छतेच्या कामासाठी प्रत्येकी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आह़े तसेच सर्व नगरसेवकांकडूनही 11 हजारांची मदत करण्यात आली आह़े लोकसहभागातून होत असलेल्या खोलीकरणाच्या कामात परिसरातील नागरिकांनीसुध्दा मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला आह़े
तळोदा येथील खर्डी नदी खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:17 PM