लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील बंधारपाडा वडगाव हद्दीत गावठी दारुचा अवैध साठा एलसीबीच्या पथकाने जप्त केला़ विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली़ बंधारपाडा वडगाव हद्दीत विरचक धरणाचे किनारी तसेच बंधारपाडा गावात दोन ठिकाणी अवैध गावठी मद्याचा साठा असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़ यानुसार त्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने दोन्ही ठिकाणी छापा टाकला असता 73 हजार 500 रुपयांचा गावठा हातीभट्टीचा व गावठी दारु गाळण्यासाठी उपयोगात येणारे रसायन, महू फूल मिळून आल़े हा साठा व साहित्य पथकाने नष्ट केल़े याठिकाणी वसंत भाऊराव वळवी, विशाल आखात्या पाडवी व हिरालाल बारक्या गावीत तिघे रा़ बंधारपाडा वडगाव यांना यांच्यावर नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल़े ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र पाडवी, विकास पाटील, रविंद्र पाडवी, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, पोलीस शिपाई राजेंद्र काटके यांनी केली़
एलसीबीच्या पथकाने पाच वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतल़े संपत महारु पाटील रा़ अकोले खुर्द ता़ माढा जि़ सोलापूर असे आरोपीचे नाव असून त्याने 2014 मध्ये सिंगपूर ता़ तळोदा हद्दीत जहांगीर रामजी वसावे यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिली होती़ घटनेनंतर संपत पाटील हा ट्रॅक्टरसह घटनास्थळावरुन फरार झाला होता़ पोलीस निरीक्षक नवले यांनी त्याची माहिती काढून शोध घेतला होता़ त्याला बुधवारी रात्री पोलीस निरीक्षक नवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, प्रमोद सोनवणे, किरण पावरा, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने ताब्यात घेत तळोदा पोलीस ठाण्याकडे सोपवल़े