लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : मध्यप्रदेशातील पानसेमल परिसरातून वनविभागाने बिबटय़ाला जेरबंद केला आह़े शेतशिवारात मुक्काम ठोकणा:या या बिबटय़ामुळे या भागात जनजीवनावर परिणाम झाला होता़ बेहडिया ता़ पानसेमल या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाचा संचार वाढला होता़ 10 वर्षे वयाच्या या बिबटय़ाकडून माणसावर हल्ला होण्याची शक्यता असल्याने सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी राजकमल आर्य यांनी या भागात पिंजरे लावत सापळा रचला होता़ यासोबत त्याठिकाणी तीन कॅमेरे लावून पाळत ठेवण्यात येत होती़ सोमवारी रात्री उशिरा बेहडिया शिवारात शाकीर बोहरी यांच्या केळीच्या शेतातील पाळीव कुत्र्यावर हल्ला करण्यासाठी आलेला बिबटय़ा वनविभागाने लावलेल्या पिंज:यात अडकला़ या भागात लावलेल्या ट्रॅप कॅमे:यातून बिबटय़ा अडकल्याचे दिसून आल्यानंतर सेंधवा येथील वनपरिक्षेत्राचे मुख्य अधिकारी विजयकुमार गुप्ता, राजकुमार आर्य, प्रमोद गुजर्र, बाबुलाल मौर्य, अजरुन पाटील, निलेश पटेल, महेश तोमर यांनी भेट देत माहिती जाणून घेतली़ या बिबटय़ाची रवानगी खंडवा जिल्ह्यातील चंदगढच्या जंगलात करण्यात आली आह़े बिबटय़ा जेरबंद झाल्याने शेतशिवारात मजूरी करणारे आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आह़े
पानसेमल परिसरातून बिबटय़ा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:00 PM