तळोदा : तालुक्यातील सर्वच 67 ग्रामपंचायतींचे बँकेतील एकल खाते बंद करण्याचे पत्र संबंधित बँकांच्या प्रशासनास येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिका:यांनी दिले आहे. साहजिकच ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारासही आता चाप बसला आहे.तळोदा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीचे बँकेत संयुक्त खात्याऐवजी एकल खाते उघडले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निधी खर्चाबाबत सरपंचांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी या पदाधिका:यांनी गटविकास अधिका:यांकडे केली होती. या पाश्र्वभूमिवर गेल्या आठवडय़ात गटविकास अधिकारींनी समन्वयासाठी पदाधिकारी अन् ग्रामसेवकांची बैठकही बोलविली होती. या बैठकीत ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराबाबत सरपंचांनी तीव्र असंतोष व्यक्त करून सभाही चांगलीच गाजविली होती. त्यानंतर गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांनी अशा ग्रामपंचायतींचे एकल खाते तातडीने बंद करण्याचे आश्वासन पदाधिका:यांना दिले होते. या पाश्र्वभूमिवर त्यांनी तळोदा तालुक्यातील सर्वच 67 ग्रामपंचायतीचे एकल खाते तातडीने बंद करून त्याऐवजी पदाधिकारी आणि ग्रामसेवकांचे संयुक्त खाते उघडण्याचे पत्र सेंट्रल बँक, बँक ऑफ बरोडा, भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभारही सुरळीत राहणार आहे. पंचायत समितीने तातडीने केलेल्या कार्यवाहीबाबत पदाधिका:यांनी समाधान व्यक्त केले आहे.गावक:यांची कामे तत्काळ होण्यासाठी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी आपापल्या कार्यालयाच्या ठिकाणी राहण्याची सक्त ताकीद दिल्याचेही गटविकास अधिका:यांनी सांगितले. ग्रामसेवक कार्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याची तक्रारदेखील बैठकीत सरपंचांनी केली होती. या पाश्र्वभूमिवर पंचायत समिती प्रशासनाने ग्रामसेवकांना सूचना दिली आहे. पंचायत समितीतदेखील कामासाठी येणा:या ग्रामसेवकांना सह्यांचे रजिस्टर ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशासनाच्या या कार्यवाहीबाबत ग्रामीण भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या आदेशाची काटेकोरपणे प्रभावी अन् ठोस अंमलबजावणी करण्याची अपेक्षा गावक:यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान याप्रकरणी प्रशासनाने कायम स्वरूपी अंमलबजावणी करावी, अन्यथा याविरोधात पुन्हा जाब विचारण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिका:यांनी दिला आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सारीका बारी यांनी तळोदा पंचायत समितीला तीन दिवसांपूर्वी भेट देवून सभागृहात बैठक घेतली होती. या बैठकीत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनादेखील बोलविण्यात आले होते. या बैठकीस जिल्ह्याने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात भाग घेतला असून, त्याबाबत स्वच्छता अॅपच्या माध्यमातून गावक:यांमध्ये जनजागृती करण्याची सूचना या वेळी त्यांनी दिली. मोबाईलवरुन प्रात्याक्षिकदेखील करून दाखविण्यात आले. याप्रसंगी गटविकास अधिकारी सावित्री खर्डे व पंचायत समितीचे विविध विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान गेल्यान आठवडय़ातच सरपंचांच्या तक्रारींच्या पाश्र्वभूमिवर झालेल्या वादळी बैठकीनंतर तिस:या दिवशीच जिल्हा परिषदेच्या अधिका:यांनी बैठक घेतल्यामुळे याबाबत कुठलाही विषय न आल्याने कर्मचा:यांनी सुटकेचा निश्वास सोडल्याची चर्चा पंचायत समितीच्या वतरुळात सुरू होती. मात्र याप्रकरणी वरिष्ठ अधिका:यांनी साफ दुर्लक्ष केल्याने पदाधिका:यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर होता.
एकल खाते बंद करण्याबाबत बँकांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:48 PM