शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
3
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
4
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
5
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
6
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
7
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
8
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
9
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
10
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
11
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
12
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
13
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
14
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
15
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
16
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
17
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
18
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
19
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
20
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...

वडिलांच्या गुरूमंत्रानेच आयुष्य प्रकाशमान झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:17 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे गुरू भेटत गेले आणि आपण घडत गेलो पण जीवनाला खऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे गुरू भेटत गेले आणि आपण घडत गेलो पण जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती वडीलांनी दिलेल्या शिक्षणाच्या गुरूमंत्राने. शिक्षणातूनच जीवन आणि समाज घडविता येतो. दीन दु:खी समाजाला प्रकाश देता येतो, असे आपले वडील यशवंत सोमजी पाटील हे नेहमी म्हणत आणि त्याच प्रेरणेने आपले आयुष्य प्रकाशमान केले असे, उद्योगपती रवींद्र पाटील सांगतात.रवींद्र पाटील हे मुळ ब्राह्मणपुरी, ता.शहादा या छोट्याशा गावातील रहिवासी. सद्या मात्र ते पुण्यात सहा उद्योग चालवितात, अनेकांना त्यांनी रोजगार दिला, ग्रामीण भागातील हा तरूण उद्योजक आंतरराष्टÑीय बाजार पेठेतही आपली छाप निर्माण करीत आहे. आपल्या गुरू विषयी ते सांगतात. आपण एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. बालवयापासूनच आपली शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेता वडीलांनी आपल्याला उच्च शिक्षणासाठी प्रेरणा दिली. मुंबई सारख्या शहरात आयआयटीमध्ये शिक्षणासाठी पाठविले आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळत होती. पण उद्योग क्षेत्रात काम करण्याचा वडीलांनी सल्ला दिला. खूप संघर्ष करावा लागला पण संघर्षानंतरचे फळ चांगलेच असते त्याचा अनुभव आपणही घेतला. या काळात आई आणि पत्नीचेही खूप सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. खरे तर आयुष्याच्या टप्या टप्प्यात भेटणारे मित्र, मोठ्या लोकांची भेट, सोबत काम करणारे सहकारी यांच्याकडूनही खूप काही शिकायला मिळाले. जे-जे चांगले ते सर्वांकडून घेता आले आणि त्यातूनच आयुष्याचा पुष्पगुच्छ गुंफता आला.बालपणीच आई-वडीलांनी दिलेली खरे बोलण्याची शिकवण आयुष्यात मोलाची ठरली.कितीही संकट आले तरी त्याला शांतपणे सामोरे जाण्याची वडीलांची शिकवण महत्त्वाची ठरली.स्वत:शी व आपल्या कामाशी प्रामाणिक राहण्याचा त्यांनी सल्ला दिला होता.आयुष्यात घेणाºयापेक्षा देणारे व्हावे. दुसºयाला नेहमी मदत करावी ही शिकवण मिळाली होती.शब्द तोलून बोलावे ही शिकवण आज उपयोगी ठरत आहे.आपला जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील शिकलेले नसले तरी त्यांनी आपल्याला उच्च शिक्षणासाठी आग्रह धरला. त्यासाठी सातत्याने प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. विशेषत: वडीलांनी बालपणीच जे संस्कार व शिकवण दिली ती मनात कायम स्वरूपी कोरली गेली. त्या वेळी त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आयुष्यात जणू गुरूमंत्र बनले आणि त्यातूनच आयुष्य फुलत गेले आणि जीवन खºया अर्थाने प्रकाशमान झाले.