लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील आसाराम बापू आश्रमात मातृ-पितृ पुजन कार्यक्रम पार पडला़ यात, मोठय़ा संख्येने भाविकांनी सहभाग घेतला होता़ दर वर्षी आश्रमात 14 फेब्रुवारी रोजी मातृ-पितृ दिन साजरा करण्यात येत असतो़ यात साधकांकडून आपल्या माता-पितांचे पुजन करण्यात येत असत़े मातृ-पितृ पुजनानिमित्त बुधवारी सकाळीच शेकडो साधकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता़ या वेळी मंडपाचीही उभारणी करण्यात आली होती़ या वेळी आश्रमाच्या जेष्ट साधकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल़े यात, त्यांनी मातृ-पितृ पुजनाचे महत्व, भारतीय संस्कृतीत माता पितांना देण्यात आलेले अनन्यसाधारण स्थान, संततीचे कर्तव्य आदी विषयांवर मार्गदर्शन केल़े या वेळी पाल्यांनी आपल्या माता पितांच्या पायांना पाण्याने स्वच्छ धुतल़े त्यांच्या पायांना फुले अर्पण करुन आशिर्वाद घेतल़े त्यानंतर त्यांच्या डोक्याला टिळा लावून त्यांचे औक्षण केल़े त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आल़े
प्रकाशा येथे मातृ-पितृ पुजन सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:29 PM