लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात विजमिटर बसविण्याचे काम अतिशय संथ गतीने होत असल्याची माहिती आह़े त्यामुळे अशा पध्दतीने कारभार सुरु असला तर, आकडीमुक्त गावाची संकल्पना कशी पूर्णत्वास येणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आह़े शासनाकडून ग्रामीण भागात विजचोरीच्या घटना थांबविण्यासाठी प्रत्येक घरी विशेषत ग्रामीण भागात विजमिटर बसविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आह़े ग्रामीण भागात विजमिटर नसल्याने अनेक वेळा आकडे टाकून विजेची चोरी करण्यात ेयेत असत़े त्यामुळे तळोदा तालुक्यात विजमिटर बसविण्याबाबत होत असलेल्या सुमार कामगिरीमुळे खरच आकडीमुक्त गाव होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आह़े हजारो लोकसंख्येचा ग्रामीण भाग असलेल्या तळोदा तालुक्यात आतार्पयत केवळ 1 हजार 115 विजमिटर बसविण्यात आलेली असल्याची माहिती आह़े शासनाने यावर उपाय म्हणून घर तेथे विजमिटर, आकडीमुक्त गाव अशा विविध संकल्पना राबविल्या आहेत़ परंतु जोर्पयत विजमिटर बसविण्यात येत नाही, ग्रामस्थाना आपल्या हक्काची विज उपलब्ध होणार नाही तोर्पयत विजचोरी कमी होणार कशी असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आह़े सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडूनच कमी विजमिटरचा पुरवठा होत असल्याने तसेच महावितरणकडे विजमिटर बसविण्यासाठी प्रशिक्षीत वायरमन तसेच इतर सहका:यांची कमतरता असल्याने विजमिटर बसविणे ढेपाळत चालले असल्याची चर्चा आह़े त्यामुळे अजून किती दिवस विजचोरी होणार व त्याचा भार सामान्य तसेच नियमित विजबिल भरणा:या ग्राहकांना सोसावा लागणार असा प्रश्न निर्माण होत आह़े अधिकारी तसेच कर्मचा:यांकडून आकडीमुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असले तरी अकुशल वायरमन तसेच विजमिटरचा कमी पुरवठा यामुळे त्यांना कामात अनेक अडचणी येत आहेत़ विजमिटर बसविण्यात यावे याबाबत वेळोवेळी लोकप्रतिनिधीसह महावितरणचे अधिकारी यांच्या बैठका पार पडत असतात़ परंतु या बैठकांमध्ये ठरविण्यात आलेल्या रुपरेषेनुसार कामगिरी होतेय की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत असत़े ग्रामीण भागात विजमिटरअभावी विजचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असत़े
वीजमिटर जोडणीचे काम संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:39 PM
तळोदा तालुक्याची स्थिती : आकडीमुक्त गाव संकल्पना पूर्णत्वास येणार कधी
ठळक मुद्दे आकडीमुक्तीच्या घोषणा ठरताय पोकळ तळोदा येथील माळी मंगल कार्यालयात आमदार उदेसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या अधिकारी तसेच तालुक्यातील ग्रामस्था यांच्या उपस्थितीत तक्रार निवार सभा घेण्यात आली़ त्यात, शहादा कार्यालयाचे कार्यकारी अभियंता धनंजय