लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाच्या महात्त्वाकांक्षी जीवन अमृत योजनेंतर्गत असलेल्या ‘ब्लड ऑन कॉल’ सेवेला नंदुरबार जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आह़े 2014 ते मार्च 2018 म्हणजे जवळपासून चार वर्षात केवळ 592 रक्त बॅगा पुरविण्यात आल्या आह़े सतत घटत जाणा:या रक्तदानाच्या प्रमाणामुळे अनेक वेळा मागणी असूनही रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत नसतो़ वाढते अपघात, मातेचे गरोदरपण, लहान बालक आदींसाठी मोठय़ा प्रमाणात रक्ताची आवश्यकता असत़े त्यामुळे रक्तअभावी प्राणहानी होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून 2014 पासून जीवन अमृत योजना सुरु करण्यात आली़ या अंतर्गत जिल्ह्यासामान्य रुग्णालयामार्फत नोंदणीकृत असलेल्या दवाखान्यांना मागणीनुसार रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत असतो़ शहर हद्दीच्या 40 किलो मीटर अंतराच्या परीक्षेत्रात या रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत असतो़ नंदुरबार तालुक्यात 28 नोंदणीकृत दवाखाने या योजनेअंतर्गत रक्त बॅगा मागण्यास पात्र ठरतात़ शासकीय धोरणानुसार 104 क्रमांकाला दूरध्वनी केल्यानंतर सुमारे अर्धा तासात रक्ताचा पुरवठा करणे बंधनकारक असत़े त्यानुसार, 2014 साली 170 रक्त बॅगा पुरवण्यात आल्या़ त्याच प्रमाणे 2015 - 128, 2016 - 144, 2017 - 113 तर मार्च 2018 र्पयत 37 रक्त बॅगांचा पुरवठा ‘ब्लड ऑन कॉल’व्दारे करण्यात आला आह़े शहरापासून 40 किमी अंतरांतर्गत असलेल्या एखाद्या रुग्णाला तत्काळ रक्ताची आवश्यकता असल्यास तो 104 क्रमांकाच्या टोल फ्री नंबरला दूरध्वनी करुन रक्ताची मागणी करू शकतो़ त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून अर्धा तासाच्या आत संबंधित रुग्णाला रक्ताचा पुरवठा करण्यात येत असतो़ परंतु योजनेबाबत सर्वसामान्यांमध्ये माहिती नसल्याने अनेक लाभाथ्र्याची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आह़ेजिल्हा सामान्य रुग्णालयाकडून गरोदर माता, लहान बाळ, पिवळे रेशन कार्डधारक, जेष्ठ नागरिक, सिकलसेलग्रस्त आदींसाठी मोफत रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत असतो़ जवळपास 90 टक्के रक्त पुरवठा हा मोफत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा सामान्य प्रशासनाकडून देण्यात आली़ त्याच प्रमाणे इतर गरजुंना 500 रुपये प्रति बॅग रक्तपुरवठा करण्यात येत असतो़ उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मागणीनुसार रक्ताचा पुरवठा करण्यास प्रचंड प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत असत़े अनेक वेळा दुर्गम भागात रक्तदान शिबिरे घेण्यात येत असतात़ परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसतो़ बोटावर मोजण्याइतकेच जण रक्तदानात सहभाग घेत असतात़ त्यामुळे रक्तदानात सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आह़े
नंदुरबार जिल्ह्यात ‘ब्लड ऑन कॉल’ला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:55 PM