लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा येथे भरगाव वेगाने येणारा ट्रक मंगळवारी रात्री रस्त्याच्या खाली उतरून उलटला. हा ट्रक ट्रॅक्टर दुरूस्तीच्या गॅरेज जवळ उभ्या असलेल्या तीन ट्रॅक्टर व एका थ्रेशरवर आदळल्याने ट्रॅक्टर व थ्रेशरचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात ट्रक चालक व वाहक हे दोघेही सुखरूप बचावले आहेत. मात्र यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत असे की, अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावरील प्रकाशा बस स्थानकाजवळ आणि बॅरेजच्या आॅफिस समोर रात्री नऊ वाजता हा ट्रक गुजरातकडे जात असताना रस्त्याचा खाली उतरून अपघात झाला. या अपघातात एक छोटे ट्रॅक्टर, दोन मोठे ट्रॅक्टर व एका थ्रेशरचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. हा अपघात रात्री झाल्याने प्रकाशा पोलीस क्षेत्राचे गौतम बोराळे, सुनील पाडवी, पंचायत समिती सदस्य जंग्या भिल यांनी तत्काळ अपघात स्थळी भेट देवून वाहतूक सुरळीत केली.या अपघाताची घटना गावात वाऱ्यासारखी पसरताच पाहणाऱ्यांनी गर्दी केली होती. या वेळी प्रकाशा पोलीस दूर क्षेत्राचे गौतम बोराळे, पंकज जिरेमाळी, यांनी गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत केली. याप्रसंगी उपसरपंच भरत पाटील उपस्थित होते.
प्रकाशा जवळ भरधाव ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:52 PM