ठळक मुद्दे18 बँकाकडे आहेत लॉकर रूम
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवी मुंबई येथील बँक ऑफ बडोदाच्या लॉकररूममध्ये भुयार करून चोरटय़ांनी चोरी केल्याची घटना सोमवारी उजेडात आली होती़ या घटनेच्या पाश्र्वभूमीवर नंदुरबार शहरातील राष्ट्रीयकृत, खाजगी आणि सहकारी बँकांच्या लॉकररूमची सुरक्षा वाढवण्यात आली आह़े शहरातील बहुतांश बँका ह्या शहरी वर्दळीच्या भागात असलेल्या बँकांचा आढावा घेतल्यावर सर्वच ठिकाणी योग्य त्या सुरक्षेच्या सुविधा असल्याची खात्री झाल्यानंतरच रिझव्र्ह बँकेने लॉकर रूम सुरू करण्याचा परवाना दिल्याची माहिती बँकांनी दिली़ मात्र सोमवारी झालेल्या चोरीनंतर बँकांनी सुरक्षेचा आढावा घेत वरिष्ठांना कळवले आह़े लॉकररूममध्ये प्रवेश करणा:यांच्या नोंदी, देण्यात येणा:या लॉकरची चावी याच्या नोंदी घेण्यासह बाहेरील बाजूस सीसीटीव्ही फुटेज अधिक चांगल्या दर्जाचे करण्याबाबत बँकांकडून पावले उचलण्यात येत आहेत़ नंदुरबारातील बँकांमध्ये लॉकररूमची कडेकोट सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:36 AM