लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील नगर भूमापन कार्यालयातील संबंधित अधिकारी रजेवर असल्यामुळे कार्यालयास ताळे लागले असून, त्यांच्याकडून मिळणारे प्रॉपर्टी कार्ड व नकाशांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. एवढेच नव्हे याअभावी दुय्यम निबंधक कार्यातील काही कामेही प्रभावित झाल्याचे नागरिक सांगतात. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तातडीने पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. तळोदा येथील नगर भूमापन कार्यातील संबंधित अधिकारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून कार्यालयासदेखील ताळे लावण्यात आले आहे. परिणामी नागरिकांची तेथील कामे सुद्धा ठप्प झाले आहेत. विशेषत: नागरिकांना येथून त्यांचे मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड, नकाशे यासारखे महत्त्वाची दस्तऐवज मिळत नाही. त्यांच्या शिवाय दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्ट्रेशन अभावी गहाण खत, खरेदीखत, हक्क सोड होत नाही. त्याकरिता शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक दररोज कार्यालयाकडे सारखे हेलपाटे मारत आहेत. यात त्यांचा वेळ, पैसा वाया जात आहे. तरीही कामे होत नसल्याने निराश होऊन परतावे लागत असल्याची व्यथा काहींनी बोलून दाखवली आहे. वास्तविक हे महत्त्वाचे दस्तावेज असल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्ट्रेशनची कामेही प्रभावित झाल्याचे नागरिक म्हणतात. याप्रकरणी भूमिअभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास विचारले असता. त्या कर्मचारीने रजेचा अर्ज दिला आहे. अजून रजा मंजूर करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर त्यांची ग्रामपंचायत निवडणूक कमी महसूल प्रशासनाने नियुक्ती केली आहे, असे असले तरी लवकरच पर्यायी कर्मचारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांचे होत असलेले हाल लक्षात घेऊन तत्काळ पर्यायी कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा या विरोधात नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भूमिलेख कार्यालयही प्रभारीवर येथील भूमिलेख कार्यालयातील तत्कालीन भूमिलेख अधीक्षकांची इतरत्र बदली झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हे कार्यालय प्रभारीवर चालू आहे. कारण नंदुरबार कार्यालयातील अधिकारींकडे अतिरिक्त चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच ते दोघं कार्यालयास पुरेसा न्याय देऊ शकत नाही. परिणामी कामेदेखील वेळेवर पूर्ण होत नसल्याच्या नागरिकांचा आरोप आहे. आधीच महत्त्वाच्या दस्तऐवजवर त्यांची स्वाक्षरी शिवाय पुढे सरकत नाही. शेतकरी वर्गास बँकेच्या कर्जाकरिता बोजा चढविण्याकरिताही फीर फीर करावी लागत आहे. निदान शासनाने नागरिकांच्या मालमत्तेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या सदर नवीन, नियमित अधिकारीच नियुक्ती करावी, अशी अपेक्षा आहे.
भूमिलेख कार्यालयही प्रभारीवर येथील भूमिलेख कार्यालयातील तत्कालीन भूमिलेख अधीक्षकांची इतरत्र बदली झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हे कार्यालय प्रभारीवर चालू आहे. कारण