लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीनिमित्त प्रवाशांची गर्दी होत असून त्यांना सुखरुप प्रवास करता यावा, यासाठी नंदुरबार एस.टी. आगारामार्फत लांब पल्ल्याच्या बसफे:या दि. 22 ऑक्टोबरपासून वाढविण्यात आल्या आहेत. परिवहन महामंडळाची ही सेवा दिवाळीला दिलेला उपहारच ठरत आहे. नंदुरबार जिल्ह्यावासी नोकरी तथा कामधंद्यानिमित्त पुण्या-मुंबईला स्थायिक झाले आहे. तर मोठय़ा शहरांमधील नागरिकही नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी विखुरले आहे. हे सर्व नोकरदार दिवाळीनिमित्त मुळगावी परतू लागली आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून बसमध्ये गर्दी होत आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेत नंदुरबार आगारामार्फत लांब पल्ल्याच्या बसफरे:यांमध्ये आजपासून वाढ करण्यात आली आहे. त्यात नंदुरबार आगाराने आज मंळवारी पुणे येथे एक बसफेरी वाढवली आहे. तर बुधवारी पुन्हा दोन वाढीव बस सेडण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापनामार्फत सांगण्यात आले. नंदुरबार आगारामार्फत मंगळवारी सोडण्यात आलेल्या बससह बुधवार दि.23 रोजी सोडण्यात येणा:या दोन्ही बसेस पुण्याहून नंदुरबारकडे येणा:या प्रवाशांमार्फत पूर्णपणे बूक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पाठोपाठ नाशिकसाठी मंगळवारपासून रोज चार तर मुंबईसाठी रोज एक बसफेरी अशा काही बसफे:या वाढविण्यात आल्या आहेत. त्याशिवाय आगार व्यवस्थापनामार्फत गर्दीनुसार बसफे:या वाढविण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले.
नंदुरबार आगारामार्फत मंगळवारी सोडण्यात आलेल्या एका बससह बुधवार दि.23 रोजी सोडण्यात येणा:या दोन्ही बसेस पुण्याहून नंदुरबारकडे येणा:या प्रवाशांमार्फत पूर्णपणे बूक करण्यात आल्या आहे. त्यामुळे आधी नंदुरबारहून बसेस सोडण्यात आल्याचे आगार व्यवस्थानामार्फत सांगण्यात आले.