शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

‘लाँग रुट’ला होतेय तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:08 PM

वाहतूक व्यवस्थेवर ताण : उन्हाळी सुटय़ांमुळे परिणाम, बसेफे-या वाढवाव्या

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सर्वत्र लगअसराई तसेच उन्हाळी सुटय़ांची धूम असल्याने यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात ताण पडत आह़े लॉन्ग रुट च्या एसटी बसेसमध्ये प्रवाशांची तोबा गर्दी होत आह़े आधिच वाढते तापमान आणि त्यात एसटीमध्ये प्रवास करीत असताना होत असलेली प्रवाशांची चेंगराचेंगरी जिवावर आली असल्याच्या भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत़वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण होत असल्याने एसटी महामंडळातर्फे हंगामी स्वरुपात जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आह़े परंतु तरीदेखील दिवसागणिक वाढत्या प्रवासी संख्येने बसेसची संख्या तोटकी पडत असल्याचे दिसून येत आह़ेनंदुरबार आगाराकडून सूरत, उदना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, पुणे आदी मार्गावर सुमारे आठ अतिरिक्त बसेसचे नियोजन केले आह़े त्यात, सूरत-उदना 2, औरंगाबाद 2, शिर्डी 1, नाशिक 2 तर पुण्यासाठी एका बसचे शेडय़ुल्ड आह़ेदरम्यान, अक्कलकुवा आगाराकडून कल्याण सकाळी साडेसहा, वाशिम सकाळी साडेपाच तर दुपारी 12 वाजता पुणे गाडी सोडण्यात येत आह़े शहादा आगाराकडून सकाळी 7 ला शहादा-मुंबई, शहादा-जामनेर, साडेआठ वाजता शहादा-वापी, शहादा-साक्री, सकाळी 11 वाजता शहादा-पुणे, सायंकाळी साडेपाचला शहादा-बडोदा, रात्री 8 वाजता शहादा-धुळे मुक्कामी बस सोडण्यात येत आह़ेगेल्या काही दिवसांपासून लगअसराईचा धुमधडाका सुरु आह़े त्यामुळे मोठय़ा संख्येने प्रवाशांची वाहतूक वाढली आह़े ही परिस्थिती लक्षात घेता एसटी महामंडळाकडून हंगामी स्वरुपावर अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आह़े जिल्ह्यातील लोकल बस बरोबरच लांब पल्ल्यांच्या बसफे:यांमध्येही वाढ करण्यात आली आह़ेप्रवासी झाले बेजारजिल्ह्याच्या तापमानात दिवसागणिक मोठी वाढ होत आह़े त्यामुळे साहजिक उकाडासुध्दा जाणवत आह़े परंतु लगअसराईनिमित्त विविध गावांना जाणेदेखील गरजेचे असत़े त्यातच एसटीमधून धक्काबुक्की करत प्रवास करावा लागत असल्याने प्रवासी चांगलेच बेजार झाले आहेत़ भर उन्हात प्रवास करताना प्रवाशांच्या अंगावर अक्षरश काटा उभा राहत असल्याचे बोलले जात आह़े खाजगी वाहनांची मोठय़ा प्रमाणात भाडेवाढ झाली आह़े त्यामुळे सर्वसामान्यांना हे दर परवडणारे नसल्याने त्याना साहजिकच एसटी बसेसनेच प्रवास करावा लागत आह़ेएसटी महामंडळ मालामालकमी भारमानामुळे महसुली उत्पन्नात तोटा सहन करीत असलेल्या एसटी महामंडळाला उन्हाळी सुटय़ा तसेच लगअसराईनिमित्त वाढलेल्या प्रवासी संख्येने नवसंजीवनी मिळत असल्याचे बोलले जात आह़े वाढत्या प्रवासी संख्येने एसटी बसेसच्या फे:यांमध्ये वाढ करावी लागत आहे तर दुसरीकडे भाडे करारावरही एसटी बसेस लगअसराईसाठी वापरल्या जात असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आह़ेएसटी महामंडळाच्या अनेक लाल बसेस भाडय़ाने देण्यात आलेल्या आहेत़ 42 रुपये पर किलोमीटर दराने बसेस भाडय़ाने दिल्या जात आहेत़शिवशाहीला मिळतेय पसंतीएसटी महामंडळाच्या लाल बसेस सोबतच शिवशाहीलाही मोठी पसंती मिळत आह़े अनेक एसी, आरामदायक आसन व्यवस्था असल्याने ह्यलक्झरीयसह्ण प्रवास करण्यासाठी शिवशाहीला प्राधान्य देण्यात येत आह़े यासाठी वेळ प्रसंगी दोन पैसे जादा मोजण्याचीही तयारी प्रवाशांकडून करण्यात येत आह़ेनाशिक मार्गावर गर्दीनाशिकसह औरंगाबाद, सूरत-उदना, पुणे, कल्याण आदी मार्गावरील बसेसमध्ये तुफान गर्दी होत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे या मार्गावरील बसफे:यांमध्ये अधिक वाढ करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आह़ेबसायलाही जागा नाहीअनेक वेळा बसेसमध्ये लांबवरच्या प्रवासात प्रवाशांच्या गर्दीमुळे बसायला तर सोडा पण उभ राहण्यालासुध्दा जागा नसल्याचे दिसून येत आह़ेयात वयोवृध्दांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत असल्याचे दिसून येत आह़े अनेक वेळा तर आसन मिळविण्याच्या स्पर्धेत प्रवाशांकडून धक्काबुक्कीदेखील करण्यात येत असल्याचे दिसून येत आह़े आगारात बस प्रवेश करते वेळीच बसच्या खिडकीतून बॅग तसेच रुमाल टाकून जागा मिळवण्यासाठी धडपड करण्यात येत असत़े