लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होती. मतदानाची टक्केवारी ही लोकसभा निवडणुकीच्या तुलनेइतकीच राहिल्याने विजयाचा दोलक कुणाकडे फिरतो याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. अक्कलकुवा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात होते. परंतु खरी लढत ही काँग्रेसचे आमदार अॅड.के.सी.पाडवी, शिवसेनेचे आमशा पाडवी आणि भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार नागेश पाडवी अशी लढत होती. तिन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली होती. प्रत्यक्ष मतदारांर्पयत पोहचण्यासाठी सर्वानीच प्रय} केला. जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी उमेदवारांची कसरत दिसून आली.विद्यमान आमदार अॅड.के.सी.पाडवी हे सात वेळा या मतदार संघातून निवडून आले आहेत. यावेळी ते आठव्यांदा निवडणुकीला सामोरे गेले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील ते काँग्रेसचे उमेदवार होते. त्यामुळे मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला होता. युतीअंतर्गत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला आल्याने आमशा पाडवी यांनी उमेदवारी केली. त्यांना जि.प.सदस्य किरसिंग वसावे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विजयसिंग पराडके यांची साथ मिळाली. शिवाय माजी आमदार व शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. अपक्ष उमेदवार नागेश पाडवी यांनी देखील आपल्या संपर्काचा पुरेपूर फायदा प्रचारात घेतला. त्यामुळे येथे तिहेरी लढत रंगली होती. मतदार राजाने कुणाच्या पारडय़ात मतदान केले यावरच विजयाचे गणित राहील.
अक्कलकुवा मतदारसंघात एकुण दोन लाख 78 हजार 845 मतदार आहेत. त्यात 1,40,347 पुरुष तर 1,38,498 महिला मतदार होते. त्यापैकी 1,02,940 पुरुष तर 0,97,162 महिला मतदार असे एकुण 2 लाख 102 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी अर्थातच 71.76 इतकी राहीली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 71 टक्के मतदान झाले होते.
मतदारसंघ दोन तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ झालेला आहे. 80 टक्के दुर्गम भागातील गाव व पाडय़ांचा समावेश या मतदारसंघात आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार करतांना मोठी कसरत उमेदवारांना करावी लागल्याचे चित्र होते.
के.सी.पाडवी -जमेची बाजू - सलग सात वेळा या मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. त्यामुळे कार्यकत्र्याची फळी निर्माण झाली आहे. या भागात केलेल्या कामांचा फायदा. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते उमेदवार असल्यामुळे हा भाग त्यांनी पिंजून काढला होता. उणिवा - मतदारसंघात संपर्काचा अभाव असल्याचा आरोप. जवळचे काही कार्यकर्ते दुरावल्याने तोटा. मोठय़ा नेत्याच्या सभेचा अभाव.
आमशा पाडवी - जमेची बाजू - शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्याने त्याचा फायदा. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मिळालेली साथ. आधीचे विरोधकांचे त्यांच्या बाजुने केलेले काम. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली धडगाव येथील प्रचार सभा.उणिवा - धडगाव तालुक्यात संपर्काचा अभाव, धडगाव तालुक्यात कामे नसल्यामुळे मतदारांपुढे जातांना मोठी कसरत. पक्षाचे चिन्ह पोहचविण्यासाठी कसरत.
नागेश पाडवी - जमेची बाजू - भाजपचे जुने कार्यकर्ते असल्याचा फायदा, सहानुभीतीचाही फायदा. गेल्या पाच वर्षापासून मतदारसंघात फिरून जास्तीत जास्त संपर्काचा प्रय}ाचा फायदा. पक्षाचे काही कार्यकर्ते त्यांच्या सोबतीला.उणिवा- अपक्ष असल्यामुळे मतदारांर्पयत पोहचण्यासाठी अडचण. पक्षाचे बॅनर नसल्यामुळे तोटा.