नंदुरबार - नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून, एकूण 56 जागा असलेल्या जिल्हा परिषदेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. प्रत्येकी 23 जागा जिंकत भाजपा आणि काँग्रेस सर्वात मोठे पक्ष ठरले आहेत. तर शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र गेल्या वेळी केवळ एक जागा जिंकणाऱ्या भाजपाने 23 जागा जिंकत यावेळी जोरदार मुसंडी मारली आहे. तर काँग्रेसची काहीशी पीछेहाट झाली आहे. 2013 मध्ये झालेल्या नंदुरबारच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने 29 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 25 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ एक जागा जिंकता आली होती. तर अपक्षांच्या खात्यात एक जागा गेली होती. शिवसेनेला मात्र त्या निवडणुकीत खातेही उघडता आले नव्हते. मात्र यावेळी मोठी उलथापालथ झाली असून, काँग्रेसला बहुमत गमवावे लागले आहे. काँग्रसचे ज्येष्ठ नेते असलेल्या के. सी. पाडवी यांच्या पत्नीलाही पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या निवडणुकीत 25 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही मोठी पीछेहाट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 3 जागा जिंतका आल्या आहेत. दुसरीकडे भाजपाने मात्र जोरदार मुसंडी मारत 23 जागा पटकवल्या आहेत. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला केवळ एक जागा जिंकता आली होती. यावेळी मात्र भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर गेल्यावेळी भोपळाही फोडू न शकलेल्या शिवसेनेने यावेळी मात्र 7 जागा जिंकल्या आहे. त्यातही शिवसेना उमेदवाराने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांच्या पत्नीचा केलेला पराभव विशेष ठरला आहे. ट
दरम्यान नंदुरबार जिल्हा परिषदेत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेत तसेच अध्यक्ष , उपाध्यक्ष आणि सभापतींच्या निवडणुकीत 7 जागा जिंकणारी शिवसेना आणि 3 जागांवर विजय मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ZP Election 2020 : नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना धक्का, जि.प. निवडणुकीत पत्नी पराभूत
ZP Election 2020: पालघरमध्ये भाजपाची पडझड; शिवसेना नं. १, पण राष्ट्रवादी 'गेम चेंजर'
जिल्हा परिषद निवडणुक: गृहमंत्री देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख विजयीया निवडणूकीत जवळपास जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांचे वारसदार आपले भाग्य आजमावित होते. त्यात ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे दोन्ही पुत्र अजित नाईक व दिपक नाईक हे विजयी झाले आहेत. माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या कन्या अॅड. सिमा वळवी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे पुत्र अभिजीत पाटील, शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी हे विजयी झाले आहेत. सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील ह्या देखील लोणखेडा गटातून विजयी झाल्या आहेत. अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यात आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी या तोरणमाळ ता. धडगाव गटातून पराभूत झाल्या आहेत. त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराने पराभूत केले आहे. तर काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक हे खांडबारा गटातून पराभूत झाले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती डॉ. भगवान पाटील हे देखील म्हसावद गटातून पराभूत झाले आहेत.