लोकमत ऑनलाईनशहादा, दि़ 21 : शहादा येथील नगरपालिका रूग्णालयात मंगळवारी मोफत मानसिक आरोग्य तपासणी, निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होत़े शिबीराचे उद्घाटन पालिकेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शहादा नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गोसावी होत़े सोबत त्प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद शेल्टे व शहादा येथील आदिवासी सेवा संस्थेचे संचालक विक्रम कान्होरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मानसोपचार तज्ञ डॉ. वंदना सोनोने यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. मार्गदर्शन करताना मोतीलाल पाटील यांनी सांगितले की, दिवसेंदिवस वाढत जाणा:या आधुनिकीकरणामुळे मानसिक आरोग्य हे बिघडत चालले आहे, तसेच आज सर्वच क्षेत्रात मानसिक ताणतणाव वाढत असून यावर उपाययोजना करण्यासाठी अशा शिबीरांची अत्यंत गरज वाढत चालली असल्याचे ते म्हणाल़े विक्रम कान्होरे यांनी रूग्ण व नातेवाईकांना येणा:या सामाजिक समस्या व उपचार पद्धतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. चिकित्सक मानसशास्त्रज्ञ प्रविण डोंगरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व जयंत वळवी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जामसिंग पावरा, रमश्या वसावे, विद्या बुंदेले, दिलवरसिंग पाडवी तसेच जिल्हा रूग्णालय नंदुरबार व नगरपालिका रूग्णालय शहादा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
आधुनिक जीवनात मानसिक आरोग्य सांभाळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 1:05 PM