लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनविभागाच्या पथकाने नंदुरबार-प्रकाशादरम्यान सापळा रचून तिघांना अटक करत, त्यांच्याकडून बिबटय़ाची कातडी आणि मांडूळ जातीचा साप ताब्यात घेतला. पथकाने ताब्यात घेतलेले तिघे संशयित जामदे, ता़ साक्री येथील आहेत. ते कातडी आणि मांडूळ मध्य प्रदेशात घेऊन जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवार, 15 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईनंतर तिघा तस्करांना नंदुरबार सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होत़े वनविभागाच्या पथकाला चार दिवसांपूर्वी तिघांकडून वाघाची कातडी आणि मांडूळाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी प्रकाशा-नंदुरबार मार्गावर तापी नदी पुलाजवळ वाहनांची तपासणी सुरू केली होती़ दरम्यान, गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास (एमएच 18-बीजे 4010 व एमएच 18-6208) या दोन दुचाकींना थांबवण्यात आल़े त्यांची तपासणी केली असता, एका दुचाकीच्या डिक्कीत बिबटय़ाची कातडी, तर दुस:या दुचाकीच्या डिक्कीत मांडूळ जातीचा जिवंत साप आढळून आला़. वनविभागाच्या पथकाने दुचाकी सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या जनाबापू कृपाराम पवार, शरद साहेबराव चव्हाण व ऑफिसर सुनक्या भोसले, रा़ जामदे, ता़ साक्री या तिघांना ताब्यात घेतल़े ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांनी मांडूळचा सौदा अघोरी विद्येसाठी शहादा व मध्य प्रदेश परिसरात केला असल्याची माहिती आह़े 20 लाख रुपयांमध्ये या मांडुळाची विक्री करण्यात येणार होती, असे सूत्रांनी सांगितल़े तिघांजवळ मिळून आलेल्या बिबटय़ाची कातडी साधारण 20 लाख रुपयांची असल्याची माहिती आह़े बिबटय़ाच्या कातडीसोबतच आणखी एका प्राण्याची कातडी वनविभागाच्या अधिका:यांना आढळून आली़ बिबटय़ा आणि अज्ञात प्राण्याची कातडी तपासणीसाठी डेहराडून (उत्तराखंड) व नाशिक येथील वनविभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आली़ या कातडीचा अहवाल आल्यानंतर तो न्यायालयात सादर होणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली़ कातडी आणि मांडुळाची खरेदी करणारे कोण, याची चौकशी करण्यात येत आह़े मांडूळचा सौदा करणा:यांचा वनविभागाचे पथक शोध घेणार असून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आह़े ही कारवाई मुख्य वनसंरक्षक टी़एऩ साळुंखे, उपवनसंरक्षक एस़बी़ केवटे, विभागीय वनअधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक पी़आऱ पाटील, वनक्षेत्रपाल धनंजय पवार, वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, विवेक देसाई, ए़आऱ निकम, कल्पेश अहिरे, बी़जी़ तांबोळी, एऩटी़ थोरात, क़ेएऩ वसावे, जी़एम़ आढावणे, जी़बी़ डोंगरे, एस़आऱ सूर्यवंशी, गणेश गवळी, बी़सी़ कुवर, एस़एस़ तुंगार, बी़एस़ साळवे, एम़बी़ बोरसे, विशाल शिरसाठ यांनी केली़ जनाबापू पवार, शरद चव्हाण व ऑफिसर भोसले या तिघांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम व भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आह़े तपास गणेश रणदिवे व मनोज रघुवंशी करीत आहेत़ दरम्यान, जिल्ह्यात मांडूळ तस्करीचा हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. बिबटय़ाची कातडी नेमकी कुठली आहे याबाबत आता वन विभागाच्या तपासावर लक्ष केंद्रीत होणार आहे.
नंदुरबारात बिबटय़ाच्या कातडीसह ‘मांडूळ’ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:20 PM