रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शक व गुरू भेटत गेले. त्यातूनच आयुष्याची बागही बहरत गेली. म्हणूनच आज आपण शेकडो भावी वकीलांच्या आयुष्यात सुगंध देऊ शकलो आणि असंख्य वंचितांना न्याय-हक्क मिळवून देऊ शकलो. या सर्व ज्ञानाचा पाया खऱ्या अर्थाने रचला तो आपले वडील स्व.बटेसिंग रघुवंशी यांनी. त्यांनी बालपणीच ‘गरीब, शोषितांच्या दु:खाकडे बघ, धनिकांचे सुख बघू नको’ हा सल्ला दिला आणि त्यातूनच खºया अर्थाने आयुष्य बदलले. ही प्रतिक्रिया आहे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ व भारताचे माजी सॉलिसीटर आॅफ जनरल अॅड.राजेंद्र रघुवंशी यांची.अॅड.राजेंद्र रघुवंशी यांचे नाव आज महाराष्टÑातील नामांकीत विधीतज्ज्ञात घेतले जाते. महाराष्टÑ-गोवा बार असोसिएशनचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. आपल्या गुरुविषयी भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे गुरू भेटत गेले. आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर नंदुरबारात एल.टी. हायस्कूल व श्रॉफ हायस्कूलमध्ये शिक्षण झाले. पुढे महाविद्यालयात अॅड.पी.एन. देशपांडे आणि डॉ.पीतांबर सरोदेसारखे गुरू भेटले. पण खरे आयुष्य कळले ते पुण्याच्या होस्टेल जीवनात. होस्टेलमध्ये मिळालेल्या मित्रांनी खूप काही शिकवले. मुंबईत नंतर विधी क्षेत्रातील गुरू अॅड.के.जे. अभ्यंकर, बापूसाहेब जहागिरदार, शेखर जहागिरदार यांनी वकीली क्षेत्रातील मार्गदर्शन केले आणि पुढे आपले आयुष्यच बदलले.महाराष्टÑातील तीन अॅडव्होकेट जनरल अरविंद बोबडे, बी.आर. मनोहर व चंद्रकांत सावंत यांनी सरकारी वकील शिकवली.बापूसाहेब जहागिरदार यांनी इंग्रजी पेपर वाचनाची शिकवण दिल्याने इंग्रजीत प्रभुत्व मिळाले.पीतांबर सरोदे यांच्यामुळे हिंदीचे वक्तृत्व मिळाले.शालेय जीवनात यशवंत स्वर्गे यांच्यासारखे गुरू मिळाले.भारताचे सॉलिसीटर झाल्यानंतर राष्टÑीय विधीतज्ज्ञ राम जेठमलाणी, मीलन बॅनर्जी यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन मिळाले.
वंचितांचे दु:ख निवारणाच्या मंत्राने आयुष्य बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:00 PM