लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माहेरुन फ्लॅट घेण्यासाठी सात लाख रुपये आणावेत यासाठी शहरातील रहिवासी असलेल्या पतीने पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला आह़े 2010 ते जानेवारी 2019 दरम्यान हा प्रकार घडला़ मिना सुरेश साळवे रा़ हाट दरवाजा, बाहेरपुरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती सुरेश शामराव साळवे रा़ राजेंद्र नगर याने 2010 ते 2019 यादरम्यान फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन सात लाख रुपये आणावेत यासाठी छळ केला होता़ दरम्यान सुरेश साळवे याच्या पहिल्या पत्नीचे त्याच्याविरोधात न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला होता़ या खटल्यास मीनाबाई साळवे यांचे नाव आह़े मीनाबाई यांच्या नावे संपत्ती असल्याने तसेच त्यांच्या मुलांना नोकरी लागली या कारणांतून वेळावेळी छळ केला होता़ याप्रकरणी यापूर्वी मीनाबाई यांनी पोलीसात तक्रार दिली होती़ या तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर शहर पोलीसांनी फिर्याद दाखल करुन घेतली़ यानुसार सुरेश शामराव साळवे याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत़ शहादाशहादा येथील माहेर आणि साक्री येथील सासर असलेल्या हर्षदा दिनेश साळूंखे यांचा माहेरुन तीन लाख रुपये आणावेत यासाठी सासरच्यांकडून छळ करण्यात आला़ याप्रकरणी विवाहिता हर्षदा यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती दिनेश, सासरे बापूराव रामभाऊ साळूंखे, सासू त्रिवेणी बापूराव साळूंखे, सुषमा सागर अहिरे सर्व रा़ साक्री, महेश बापूराव साळूंखे व अर्चना महेश साळूंखे दोघे रा़ नाशिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल येलवे करत आहेत़
सात लाखांसाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:02 PM