लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र शासनाने शेअर मार्केटवर नव्याने 10 टक्के ‘कॅपीटल टॅक्स’ लावला आह़े त्यामुळे याचा परिणाम म्हणून शेअर बाजार गडगडला आह़े गुंतवणूकदारही आता शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास धजावत नसल्याचे मत जिल्ह्यातील शेअर बाजारातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े केंद्र शासनाने नुकतेच आपल्या सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील अंतीम अर्थसंकल्प सादर केला आह़े शेवटचा अर्थसंकल्प असल्याने या व्यापारी, मध्यवर्गीयांसाठी काही तरी ‘खास’ असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती़ परंतु या अर्थसंकल्पामुळे मध्यवर्गीय व शेअर बाजाराची तरी सध्या निराशाच झालेली दिसून येत आह़े या अर्थसंकल्पात शेअर मार्केटवर 10 टक्के ‘कॅपीटल टॅक्स’ व ‘सिक्युरीटी ट्रान्ङॉक्शन टॅक्स’ लावण्यात आला आह़े त्यामुळे शेअर बाजारदेखील 1 हजार पॉईंटने खाली आल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणा:यांमध्ये चांगलीच धडकी भरली गेली असल्याचे जाणकारांकडून आता सांगण्यात येत आह़े शासनाने हा टॅक्स रद्द केला नाही तर किमान कमी करावा अशी अपेक्षा आता गुंतवणूकदारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, अर्थसंकल्प सादर होत असतानादेखील देशभरात शेअर बाजार पूर्णपणे खाली कोसळला होता़ शेअर बाजारावर टॅक्स लावताच बहुसंख्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला असल्याचे दिसून येत होत़े इतर व्यवसाय घेणार वेग.दरम्यान शेअर बाजारावर टॅक्स लावण्यात आल्याने गुंतवणूकदार कमालीचे नाराज आहेत़ त्यामुळे याचा फटका शेअर बाजाराला बसत असल्याचे दिसून येत आह़े शिवाय यामुळे सध्या कोमात गेलेले मालमत्ता खरेदी- विक्री व्यवहारांना संजीवनी मिळणार असल्याचे दिसून येत आह़े त्याच प्रकारे सुवर्णबाजारही यामुळे चांगलीच पकड बसवेल अशी माहिती जाणकारांकडून देण्यात येत आह़े शेअर बाजारात पुन्हा तेजी आणायची असल्यास कॅपीटल टॅक्स काही अंशी कमी करणे गरजेचे आह़े अथवा शेअर बाजारात कमालीची घसरण होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े
‘कॅपीटल टॅक्स’नी बाजार गडगडला. : नंदुरबारातील शेअर बाजाराची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:47 PM