लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समिती कायम कर्मचा:यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कर्मचा:यांनी सोमवार, 5 ऑगस्टपासून बेमुदत बंद पुकारला आहे. बंदच्या पहिल्याच दिवशी बाजार समिती परिसरात शुकशुकाट होता. यामुळे दैनंदिन जवळपास 50 लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे.राज्य बाजार समिती कृती समिती आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत कृती समितीतर्फे दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षापासून बाजार समिती कर्मचा:यांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचा:यांनी आता निर्णायक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा व नवापूर आदी बाजार समितींचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.बंदमुळे भाजीपाला मार्केट, भुसार मार्केट व मंगळवारी होणारा जनावरे खरेदी-विक्रीचा बाजार बंद राहणार आहे. यामुळे दैनंदिन जवळपास 50 लाखांची उलाढाल ठप्प आहे. सोमवारी बंदचा पहिला दिवस असल्याने बाजार समिती आवारात शुकशुकाट होता. कर्मचा:यांनी गेटजवळ धरणे धरून आंदोलन केले.
बाजार समिती कर्मचा:यांचा बेमुदत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:20 PM