लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : १५ दिवसांपूर्वी चर्चेचा विषय असलेला कांदा मातीमोल दरात विक्री होण्यास सुरुवात झाली असून पालेभाज्या आणि इतर भाजीपाला उत्पादनांचे दर कोसळल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ ऐन हंगामात भाजीपाला उत्पादनावर मंदीची कुºहाड कोसळली आहे़ विशेष बाब म्हणजे नंदुरबार बाजारात १५ दिवसांपासून आवक कमी असून मातीमोल दरात भाजीपाला खरेदी सुरु आहे़नंदुरबार बाजार समितीच्या मार्केट यार्डात रविवार वगळता आठवड्याचे सहा दिवस भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार होतात़ डिसेंबर मध्यापर्यंत भाजीपाला आवक वाढूनही दरांमध्ये स्थिरता असल्याने शेतकरी खर्च काढून नफा मिळवत होते़ परंतू नव्या वर्षाच्या प्रारंभापासून कांदा दर कोसळल्यानंतर बटाटे, टमाटे, मेथी, कोथिंबीरसह पालेभाज्यांच्या दरांमध्ये मोठी घट आली आहे़ यातून किरकोळ बाजारात पालेभाज्या थेट पाच रुपये जुडीच्या दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे़ नंदुरबार सह साक्री तालुक्यातून येणाºया या भाजीपाला दरात झालेली घट शेतकऱ्यांच्या वार्षिक नियोजनासह वर्तमानातील आर्थिक स्थितीवर परिणामकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे़ कांद्याने तब्बल दोन महिने बाजार गरम ठेवल्यानंतर अचानक दर कोसळल्याने शेतकºयांसह व्यापारीही नुकसानीच्या गर्तेत सापडल्याचे चित्र सध्या बाजारात आहे़ही स्थिती १५ दिवसांपर्यंत कायम राहणाºयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ बाजारात नवीन कांदा रुजू झाल्यानंतर दरांमध्ये आणखी सुधारणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे़बाजारात दोन आठवड्यांपूर्वी ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात येत होती़ हे दर तब्बल तीन महिने स्थिर होते़ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कांद्याच्या दरांमध्ये पड येत गेल्याने हे दर आजअखेरीस २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत आले आहेत़ यातही केवळ चांगल्या प्रतीच्याच कांद्याला हे दर मिळत आहेत़ खराब कांदा १० ते १५ रुपये प्रतिकिलो दराने व्यापाºयांकडून खरेदी होत आहे़ यातून शेतकºयांचे नुकसान होत असल्याने त्यांनी कांदा आणणे बंद केले आहे़ परिणामी १० दिवसांपासून मार्केट यार्डात दर दिवशी २०० कट्टे कांदा येत आहे़ हा कांदा साठवून त्याची परराज्यात विक्री होत असल्याने किरकोळ बाजारातील दर मात्र चढेच असल्याचे दिसून आले आहे़ यातून शेतकरी आणि सामान्या दोघांनाही महागाईचा अनुभव कायम आहे़ येत्या काळात बाजारात नवीन कांदा येणार आहे़ हा कांदा विक्रीसाठी आल्यानंतर ही परवड थांबेल अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे़
कांदा आणि पालेभाज्यांचे दर कोसळल्याने बाजार थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:18 PM