नंदुरबार : कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आह़े गुरुवारी नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 टन कांद्याची आवक झाल्याची माहिती देण्यात आली़ परंतु भाव मिळत नसल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त केली जात आह़ेजिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कांद्याचा प्रश्न महत्वाचा ठरत आह़े कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतक:यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ नंदुरबार येथील बाजार समितीत साधारणत: 200 ते 500 रुपये क्विंटल दराने कांद्याची विक्री करण्यात येत आह़े चांगला कांदासुध्दा जास्तीत जास्ती पाच रुपये प्रतीकिलो दराने विकला जात आह़े त्याचा प्रमाणे पांढ:या कांद्यालाही भाव नसल्याने शेतक:यांना कवडीमोल भावात कांद्याची विक्री करावी लागत आह़े कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने शेतक:यांना आर्थिक संकटांचा सामोरे जावे लागत आह़े कांद्याचा उत्पादन खर्चही निघणे कठीण होत असल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळसह लगतच्या गावांमध्ये मोठय़ा संख्येने कांद्याचे उत्पादन घेतले जात असत़े त्यामुळे संबंधित गावातील कांदा उत्पादक शेतक:यांना मोठा आर्थिक फटका बसत आह़े कांद्याला भाव मिळेल या आशेने अनेक शेतक:यांनी कांदा साठवूण ठेवला होता़ परंतु तरीही भाव मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर शेवटी कांदा विक्रीला काढावा लागला़
कांद्याच्या गोण्यांनी मार्केट ‘हाऊसफुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 1:10 PM