लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : विवाहिसाठी लागणारा खर्च वाचविण्यासाठी तळोद्यात मनियार समाज पंच व मणियार वेल्फेअर सोसायटीतर्फे इज्तेमाई शादिया हा सामुहिक विवाह सोहळा घेण्यात आला. या सोहळ्यात एकुण पाच जोडप्यांचे लगA समाजबांधवांच्या साक्षीने लावण्यात आले. सोहळ्यात माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, योगेश चौधरी, नितीन पाडवी, प्रा.विलास डामरे, नगरसेवक संजय माळी, जामा मशिदीचे मौलाना शोएब रजा नुरी, हाजी निसारअली शे.मोहम्मद मक्राणी, अॅड.नुरमोहम्मद शेख,अब्बासअली, रहिम मनियार, नगरसेवक संदीप परदेशी, हितेंद्र क्षत्रीय, योगेश मराठे, अनिता परदेशी, कल्पेश चौधरी, मनियार वेल्फेअर सोसायीचे अध्यक्ष शे.नासिर शे.सत्तार, मनियार, उपाध्यक्ष शे.रफिक शे.हाजी हबीब, सचिव मोसिन शे. अजिज, सैयद इमरान, अॅड.मेहबुब मन्सुरी, नासिर शे. इत्तार नियार, यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. यावेळी जामा मशिदीचे मौलाना शोएब रजा नुरी यांनी पाच जोडप्यांचा निकाह लावला. या पहिल्याच सामुहिक विवाह सोहळ्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात व मध्यप्रदेशातील मनियार समाजाच्या बहुसंख्य बांधवांनी उपस्थिती नोंदवली.
विवाहासाठी लागणारा खर्च पेलवला जात नाही. हा खर्च बहुतांश कुटुंबीयांच्या नाकी नऊ आणतो. मणियार समाजातील असंख्य सामान्य व गरीब कुटुंबियांना अशा उपक्रमांमध्ये आधार देण्यासाठी तळोद्यात हा सोहळा राबविण्यात आला असून हा सोहळा पहिलाच असल्याचे सांगण्यात आले. यातून पाच कुटुंबांचा लाखोंचा खर्च वाचला असल्याचे देखील समाज पंच मंडळातर्फे सांगण्यात आले.